खासदारांच्या दौैऱ्याचे फलित शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:26 AM2019-07-11T00:26:02+5:302019-07-11T00:26:15+5:30
कल्याणमधील वास्तव : स्कायवॉकवर फेरीवाले, कचऱ्याचे साम्राज्य कायम
कल्याण : भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांनी रविवारी भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाºया कल्याण पश्चिमेकडील रेल्वेस्थानकातील स्कायवॉकची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी तेथील कचºयाचे साम्राज्य पाहता केडीएमसीचे ‘क’ प्रभाग अधिकारी भारत पवार यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यामुळे तेथील परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा होती. परंतु, दौºयाच्या वेळी गायब झालेल्या फेरीवाले येथे बिनदिक्कतपणे पुन्हा व्यवसाय करू लागले आहेत. परिणामी, त्यांच्याकडून होणाºया कचºयामुळे स्कायवॉकवर बकाल अवस्था पाहायला मिळत आहे.
रेल्वेस्थानक परिसरातील केडीएमसीचा स्कायवॉक हा पादचारी आणि प्रवाशांसाठी बांधण्यात आला असलातरी महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने स्कायवॉकवर सर्रासपणे फेरीवाल्यांकडून व्यवसाय थाटले जात आहेत. आयुक्तांसह सत्ताधाºयांनीही या परिस्थितीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने स्कायवॉकवर फेरीवाल्यांसह भिकारी, गर्दुल्ले, वारांगना यांचाही वावर सातत्याने असतो. स्कायवॉकवर अस्वच्छतेचे सम्राज्यही असते. एकप्रकारे हा स्कायवॉक त्यांना आंदण दिल्याचे चित्र पाटील यांच्या दौºयानंतरही पाहायला मिळत आहे.
फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि अस्वच्छता यासंदर्भात प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींवरून पाटील यांनी रविवारी कल्याण रेल्वेस्थानकाला भेट देत पश्चिमेतील स्कायवॉकची पाहणी केली. यावेळी खासदारांसमवेत आमदार नरेंद्र पवार हेदेखील होते. खासदारांचा दौरा होणार, याची माहिती मिळताच फेरीवाले गायब झाले होते. मात्र, पाटील यांना दौºयादरम्यान स्कायवॉकवर अस्वच्छतेचे दर्शन घडल्याने त्यांनी प्रभाग अधिकारी पवार यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी मोबाइलवर आलेल्या तक्रारी आणि फोटोही खासदारांनी त्यांना दाखवले होते. पाटील यांनी दौºयात प्रवाशांशीही संवाद साधत त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या होत्या.
स्कायवॉकवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि गर्दुल्ल्यांचा, भिकाºयांचा प्रवासी व पादचाºयांना होणारा त्रास पाहता अधिकारी आणि पोलीस यांची विशेष बैठक घेतली जाईल, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले होते.
तर, केडीएमसी आणि रेल्वे प्रशासन यांनी समन्वय साधून प्रवाशांच्या तक्रारींचे निराकरण करावे, असे आदेशही संबंधित अधिकाºयांना पाटील यांनी दिले होते. परंतु, दौरा होऊनही स्कायवॉकवरची परिस्थिती ‘जैसे थे’च राहिल्याचे पाहायला मिळत आहे.
फेरीवाल्यांचे अतिक्रमण आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या कचºयाचे चित्र पाहता खासदारांच्या दौºयाने काय साधले, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.