Bhayander: भाईंदरमध्ये ४० वर्षे जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला, एका व्यक्तीचा मृत्यू, ४ जखमी
By धीरज परब | Published: July 20, 2023 02:12 PM2023-07-20T14:12:45+5:302023-07-20T15:43:53+5:30
Mira Bhayander: भाईंदर पूर्वेच्या रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटर समोरील नवकीर्ती या ४० वर्ष जुनी इमारतीचा काही तुटला असून त्यात चार जण जखमी झाले आहेत.
- धीरज परब
भाईंदर - भाईंदर पूर्वेच्या रेल्वे स्थानकाच्या तिकीट काउंटर समोरील नवकीर्ती या ४० वर्ष जुनी इमारतीचा काही तुटला असून त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. त्यात एकाचा पाय तुटला असल्याची माहिती बचाव कार्यास आलेल्या अग्निशमन विभागाने दिली आहे. तर सदरील इमारतीला पालिकेने १२ दिवस अगोदरच धोकादायक घोषित केले आहे. जखमी मध्ये इंद्रजित शर्मा वय ४८, जॉर्ज फर्नांडिस वय ५५, हरिशंकर मौर्या वय ५५ अबिद अली वय २२ यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांना पंडित भीमसेन जोशी रुग्णालय भाईंदर येथे दाखल करण्यात आहे. त्यासोबतच एक रिक्षा व एक ऍक्टिव्हा यांचे नुकसान झाले असून, त्यासोबतच ऑर्केस्ट्रा बारच्या सामानाचे मोठे नुकसान झाले आहेत.
भाईंदर येथील सदरील इमारती स्ट्रक्चर ऑडिट ( इमारत सरंचना अहवाल ) सोसायटी वाल्यांनी केले होते व ते पालिकेत जमा करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेचे प्रभाग अधिकारी व इंजिनिअर येऊन त्यांनी येऊन पाहणी करून सदरील इमारती स्ट्रक्चर ऑडिट पुन्हा करण्याचे सांगितले. त्यानंतरतो अहवाल यावरून त्यास धोकादायक ठरवून ती इमारत १२ जुलै पर्यंत खाली करण्याचे आदेश दिले होते. मात्र सदरील इमारतीमध्ये ऑर्केस्ट्रा बार व परमिट रूम बार असल्याने ते खाली करण्यात आले नव्हते. सोसायटीमधील एकूण ३६ सदनिका धारकांनी सदनिका खाली केल्या होत्या. तसेच फक्त १६ व्यावसायिक गाळ्यात व्यवसाय सुरू होता. सकाळी सकाळी सदरील इमारतीचा भाग कोसळून पडल्याने ही घटना घडल्याने कोणतीही मोठी हानी झाली नाही आहे.
पालिकेकडून सदर इमारत धोकादायक म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आली होती. सदर इमारत यापूर्वीच खाली करण्यात आली असून,रहिवास व्याप्त नव्हती फक्त तळमजला येथे दुकाने सुरु होती. या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांसह घटनास्थळी बचावकार्यासाठी अग्निशमन दलाची ३ वाहने, १ रेस्क्यू व्हॅन तसेच अग्निशमन जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे असे मिळून ५४ अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत. सदरील इमारतीमध्ये १६गाळे, ३२ सदनिका आहेत. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांमध्ये तीन पादचारी व एक रिक्षाचालक आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच आयुक्त दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त मनोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड आणि पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.