ठाण्यातील राबोडी परिसरात घराचा काही भाग कोसळला; सुदैवाने कुठलीही दुखापत नाही
By अजित मांडके | Published: July 12, 2022 01:54 PM2022-07-12T13:54:34+5:302022-07-12T13:55:33+5:30
घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरातील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले.
ठाणे : राबोडी-१ येथील लोडबेरींग केलेल्या घराचा काही भाग पडल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांच्या सुमारास समोर आली. आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरातील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.
राबोडी १ परिसरातील कत्तल खाना रोड, रेहमद नगर येथे सईदा सलीम कुरेशी यांच्या मालकीचे तळ अधिक एक मजली लोडबेरींगचे घर आहे. त्या घराचा काही भाग पडल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेला मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १-पिकअप वाहन व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (उथळसर प्रभाग समिती) या विभागाने धाव घेतली. तसेच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरातील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.