ठाण्यात धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला; जीवितहानी टळली
By जितेंद्र कालेकर | Updated: July 7, 2024 18:58 IST2024-07-07T18:57:51+5:302024-07-07T18:58:05+5:30
कडवा गल्लीतील विकास डेपोच्या जवळ असलेली पांडे हाऊस ही ९० वर्षे जुनी असलेली तळ अधिक दोन मजली अति धोकादायक तसेच राहण्यास योग्य नसलेल्या इमारतीचा काही भाग अचानक रस्त्यावर पडला.

ठाण्यात धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला; जीवितहानी टळली
ठाणे: जांभळी नाक्यावरील कडवा गल्लीतील पांडे हाऊस ही धोकादायक रिकाम्या इमारतीचा जीर्ण भाग कोसळल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. ही इमारती रिकामी केलेली असल्याने सुदैवाने या ष्घटनेत कोणतीही जिवित किंवा वित्तीय हानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवसपन विभागाने दिली.
कडवा गल्लीतील विकास डेपोच्या जवळ असलेली पांडे हाऊस ही ९० वर्षे जुनी असलेली तळ अधिक दोन मजली अति धोकादायक तसेच राहण्यास योग्य नसलेल्या इमारतीचा काही भाग अचानक रस्त्यावर पडला. उर्वरित इमारत धोकादायक स्थितीमध्ये असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर घटनास्ळी अग्निशमन दलाचे जवान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, नौपाडा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी दाखल झाले होते.
या इमारत न्यायप्रविष्ट असून अति धोकादायक झाल्याने ती काही दिवसांपूवीर्च रिक्त केल्याची माहिती अतिक्रमण विभागाने दिली. घटनास्थळी सुरक्षेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मार्फतीने मार्फत धोकापट्टी बांधून बॅरिगेटिंग करण्यात आले आहे. इमारतीचा अत्यंत धोकादायक स्थितीत असलेला काही भाग अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने बाजूला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.