सर्व शक्यतांपलीकडील प्रेरणा" या राष्ट्रस्तरीय वेबिनारमध्ये संयुक्त राष्ट्रांतील विद्यार्थ्यांचाही सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 03:45 PM2020-07-25T15:45:55+5:302020-07-25T15:49:37+5:30

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा अॉनलाईन प्रेरणादायी उपक्रम संपन्न झाला.

Participation of students from the United Nations in a national webinar on "Inspiration beyond all possibilities" | सर्व शक्यतांपलीकडील प्रेरणा" या राष्ट्रस्तरीय वेबिनारमध्ये संयुक्त राष्ट्रांतील विद्यार्थ्यांचाही सहभाग

सर्व शक्यतांपलीकडील प्रेरणा" या राष्ट्रस्तरीय वेबिनारमध्ये संयुक्त राष्ट्रांतील विद्यार्थ्यांचाही सहभाग

Next
ठळक मुद्देसर्व शक्यतांपलीकडील प्रेरणा" या विषयावर राष्ट्रस्तरीय वेबिनारसंयुक्त राष्ट्रांतील विद्यार्थ्यांचाही सहभागसतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचा अॉनलाईन प्रेरणादायी उपक्रम

ठाणे : कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकाळात शिक्षणव्यवस्था पुरती कोलमडलेली आहे. या काळात  विद्यार्थी व पालकांना नैराश्याच्या या गर्तेतून सुखरूपणे बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यांना प्रेरक विचारांची मेजवानी देवून त्यांच्यातल्या नकारात्मकतेला मुळासकट नष्ट करता येईल. हा मुख्य हेतू लक्षात घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाच्या इंग्रजी व आयटी विभागांतर्गत  "सर्व शक्यतांपलीकडील प्रेरणा"( Motivation beyond  all odd ) या विषयावर विनामूल्य एकदिवसीय राष्ट्रस्तरीय प्रेरणादायी सत्र शनिवारी आयोजित करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय वेबिनारला भारताबरोबरच सौदी आरेबिया, कुवैत, नेपाळ, ओमान, पेरू आणि संयुक्त राष्ट्रांतील विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

कार्यक्रमाची सुरूवात गीता कुलकर्णी या विद्यार्थिनीच्या सरस्वती वंदना व गणेश वंदना यांच्या सादरीकरणातून  झाली. पहिल्या सत्रात 'सहा इंचाचा खेळ' या विषयावर 'अॉनसाईट इलेक्ट्रो सर्व्हिस,मुंबई येथे प्रशिक्षण प्रमुख या पदावर कार्यरत नितीन नायर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. "माणूस आपल्या अवतीभवती अमर्याद प्रमाणात असलेले ज्ञान दोन कर्णेंद्रियांमधील ज्ञानेंद्रियांमार्फत आत्मसात करतो या दोन कर्णेंद्रियांसोबतच त्यांदरम्यानची ६ इंचाची जागा मानवाच्या यशस्वी आयुष्याची खेळपट्टी होय" असे ते म्हणाले. विचार म्हणजे नेमके काय? विचारांची उगमस्थाने, विचारांचे महत्त्व, यशासाठी सकारात्मक विचारांची आवश्यकता अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला. मानवी मेंदूतील पेशींच्या सक्रीय क्रियाकलापातून  विचारांची उत्पती होते. आपण पाहिलेला एखादा चित्रपट, घटना,वाचलेले एखादे पुस्तक, आपल्या आजूबाजूला वावरणारी माणसे व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्यावरील प्रभाव या बाबी विचारप्रक्रियेला उर्जा देतात. सकारात्मक विचार-भावना यशोमार्ग दाखवतात. अपयशाला न घाबरता त्याला सामारे जाणे गरजेचे आहे, हे विचार मांडताना त्यांनी अल्बर्ट आइनस्टाइन, सचिन तेंडूलकर, दिपिका पादुकोण यांसारख्या  दिग्गजांची उदाहरणे दिली. तसेच विश्वास, समर्पण आणि उत्कटता या त्रिसुत्रीच्या बळावर वयाच्या १० व्या वर्षी झालेल्या गंभीर अपघातामुळे, जीवनात निर्माण झालेल्या संघर्षाला ते यशस्वीपणे कसे सामारे गेले, ते थोडक्यात सांगितले.     
    दुसऱ्या सत्रात 'सशस्त्र सेनेतील करिअर'  या विषयावर फोर्टीफाय मेंटर्स या संस्थेचे संस्थापक व निवृत्त लेफ्टनंट कर्नल ओमर पाठारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. NDA-राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी , IMA- भारतीय सैन्य अकादमीतील प्रशिक्षणकाळ आणि प्रत्यक्ष सीमेवर तैनात असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी विशद केले.  सैन्यदलात करिअर करू पाहणाऱ्यासाठी भूदल, हवाईदल, नौदल या तिनही सैन्यदलातील विविध विभागांची माहिती दिली. १०वी,१२वी नंतर उपलब्ध असलेल्या सैन्यदलातील संधींचा त्यांनी थोडक्यात आढावा घेतला. सैन्यात वैद्यकीय, अभियांत्रिकी    विभागातही अनेक संधी उपलब्ध होतात, असे ते म्हणाले. याचबरोबर सैनिकांना मिळणाऱ्या सोयी व सवलती त्यांनी विशद केल्या.
    उद्या दि.२६ जुलै रोजी देशात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त एन.सी.सी च्या विद्यार्थिनींनी आज देशभक्तीपर गितांच्या गायनातून व नृत्य सादरीकरणातून भारतीय सैन्याला मानवंदना दिली. कार्यक्रमाची सांगता कुलदीप पाथर्वे या विद्यार्थ्याने गायिलेल्या राष्ट्रगिताने झाली. संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान, सचिव कमलेश प्रधान, व्यवस्थापन सदस्या मानसी प्रधान प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मराठे यांच्या अमोल मार्गदर्शनातून, विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागातून हा आंतरराष्ट्रीय उपक्रम राबवता आल्याचे आयोजन समिती प्रमुख डॉ.राधिका मुखर्जी यांनी सांगितले.

Web Title: Participation of students from the United Nations in a national webinar on "Inspiration beyond all possibilities"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.