उल्हासनगर महापालिका सभागृहात फाळणीचे चित्र प्रदर्शन, स्वातंत्र्य सेनानी बाबुराव जेरे यांच्या फत्नीच्या हस्ते उद्घाटन
By सदानंद नाईक | Published: August 14, 2022 08:20 PM2022-08-14T20:20:09+5:302022-08-14T20:21:55+5:30
उल्हासनगर महापालिकेने देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. स्वातंत्र्य दिनापूर्वी रविवारी महापालिका सभागृहात फाळणी वेळच्या विदारक परिस्थितीचे चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
उल्हासनगर: महापालिका सभागृहात फाळणी वेळेच्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन स्वातंत्र सेनानी बाबुराव जेरे यांच्या पत्नी सुचेता जेरे यांच्या हस्ते झाले. उल्हासनगर निर्वासित झालेल्या नागरिकांची कर्मभूमी असल्याने फाळणीचे दुःख येथील नागरिकांनी अनुभवले असल्याचे मत यावेळी आयुक्त अजीज शेख यांनी व्यक्त केले आहे.
उल्हासनगर महापालिकेने देशाच्या अमृत महोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. स्वातंत्र्य दिनापूर्वी रविवारी महापालिका सभागृहात फाळणी वेळच्या विदारक परिस्थितीचे चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन स्वातंत्र सेनानी बाबुराव जेरे यांच्या पत्नी सुचेता जेरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापालिका आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे, सुभाष जाधव, वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे, जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी मनीष हिवरे, सहायक आयुक्त तुषार सोनावणे, अजित गोवारी, महापालिकेचे सुरक्षा अधिकारी बाळू नेटके आदीजन उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र सेनानींचे मोठे योगदान असून स्वातंत्र सेनानी बाबुराव जेरे यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेऊन तुरुंगवास भोगल्याची माहिती त्यांच्या पत्नी सुचेता जेरे यांनी यावेळी दिली. देशाच्या फाळणीवेळी जे लाखो नागरिक विस्थापित झाले. त्यातील बहुतांश निर्वासित सिंधी बांधव उल्हासनगरमध्ये वसले आहेत. त्यांच्या साठीच उल्हासनगर शहराची स्थापना झाली असून फाळणीचे दुःख काय असते. ते दुःख स्वतः सिंधी समाजाने अनुभवले आहे. आजही जुने सिंधी बांधव फाळणी वेळी निर्वासित होऊन शहरात कसे आले, याबाबतची माहिती देतात. तेंव्हा सर्वांगावर काटा उभा राहतो, असे आयुक्त शेख म्हणाले. फाळणीचे चित्र प्रदर्शन रविवार व सोमवारी सुरू राहणार असून नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन आयुक्त अजीज शेख यांनी दिली.
सुरक्षा रक्षक जैस्वालच्या रोंगोळीचे कौतुक
महापालिका सभागृहातील चित्र प्रदर्शनाच्या मधोमध देशाच्या क्रांतिकारकावर महापालिकेचे सुरक्षारक्षक जैस्वाल यांनी सुंदर रांगोळी काढली आहे. आयुक्त शेख यांच्यासह अतिरिक्त आयुक्य करुणा जुईकर यांनी रांगोळीचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली.