परुळेकरचा आयुष वर्तक चमकला
By Admin | Published: May 11, 2016 01:40 AM2016-05-11T01:40:00+5:302016-05-11T01:40:00+5:30
एम. जी. परुळेकर शाळेचा विद्यार्थी आयुष वर्तक याची नुकत्याच झालेल्या निवड चाचणीतून १२ वर्षा खालील खेळाडूंच्या संभाव्य क्रि केट संघाच्या प्रशिक्षण शिबिरा साठी निवड झाली
वसई : एम. जी. परुळेकर शाळेचा विद्यार्थी आयुष वर्तक याची नुकत्याच झालेल्या निवड चाचणीतून १२ वर्षा खालील खेळाडूंच्या संभाव्य क्रि केट संघाच्या प्रशिक्षण शिबिरा साठी निवड झाली, मागील २ वर्षा पासून तो साईनाथ क्रि केट अॅकॅडमी व ज्युवे स्पोर्टÞ्स आणि प्रशिक्षक किरण जुवेकर सर, नरेश दळवी सर, पागधरे सर, विवेक कदम सर यांच्या मार्गदर्शना खाली सराव करत आहे, उजव्या हाताने फलंदाजी करणारा आयुष क्षेत्ररक्षणही चांगले करतो तसेच उजव्या हाताने आॅफ स्पीन गोलंदाजी करतो.
एम सी .ए. तर्फे वरील निवडचाचणी अंतर्गत फेब्रुवारी २०१६ मध्ये संपूर्ण मुंबई विभागातून एकूण २४ संघांची नॉक आऊट स्पर्धा खेळवली गेली. त्या स्पर्धेसाठी मिरारोड ते विरार विभागातून जवळ जवळ २०० मुलामधून एक संघ निवडला होता व त्या संघात अयुषची केवळ निवडच झाली असे नाही तर त्याच्यावर संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली.
डी. वाय.पाटील (नवी मुंबई) सारख्या प्रतिथयश अनुभवी संघाशी लढताना मर्यादित २५ षटकात अयुषने एकबाजू शेवटपर्यंत लावून धरत नाबाद ५५ धावा फटकावल्या, त्या खणखणीत सात चौकारांच्या आतषबाजीने. आपल्या नवोदित सहकाऱ्यांबरोबर भागीदारी करत संघाला १८० धावांची सुस्थिति प्राप्त करून देतांना व शेवटपर्यंत चिकाटीने झुंजतांना एम. सी. ए . मान्यताप्राप्त स्पर्धेत आपले पहिले अर्धशतक झळकावले. त्यानंतर क्षेत्ररक्षण व गोलंदाजी अशी अष्टपैलू कामगिरी करून संघास विजय प्राप्त करून दिला. त्यानंतर प्रबोधिनी गोरेगाव संघास चारी मुंड्या चीत केले व त्यानंतर दिलीप वेंगसरकर अॅकॅडमीला टाय अवस्थेत रोखले ते २१ वे षटक स्वत: टाकून. त्या षटकात त्याने २ बळी मिळवले व सामन्यात रंगत निर्माण केली. शेवटी शेवटच्या २५ व्या निर्णायक षटकात स्वत: टिचून गोलंदाजी करून फलंदाजांना रोखले. (वार्ताहर)