परवाना परीक्षेत ९६५ उमेदवार उत्तीर्ण
By Admin | Published: March 7, 2016 02:25 AM2016-03-07T02:25:09+5:302016-03-07T02:25:09+5:30
प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रिक्षा परवाने वाटपासाठी प्रथमच घेतलेल्या मराठी भाषेच्या मौखिक चाचणीची प्रक्रि या नुकतीच पूर्ण झाली आहे.
पनवेल : प्रादेशिक परिवहन विभागामार्फत रिक्षा परवाने वाटपासाठी प्रथमच घेतलेल्या मराठी भाषेच्या मौखिक चाचणीची प्रक्रि या नुकतीच पूर्ण झाली आहे. पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कळंबोली याठिकाणी घेण्यात आलेल्या या परीक्षेला एकूण १११६ उमेदवार लॉटरी पध्दतीने उत्तीर्ण झाले होते. त्यापैकी ९६५ उमेदवार या परीक्षेला हजर राहिले होते. मराठी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ९६५ जण यशस्वी झाले, तर १० उमेदवार मराठी वाचता येत नसल्याने अनुत्तीर्ण झाले.
परीक्षा घेण्यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत चोख उपाययोजना करण्यात आल्या होत्या. ४ टेबलवर एक परिवहन अधिकारी, एका मराठी पत्रकाराची नियुक्ती करण्यात आली होती. ६ दिवस चाललेल्या या परीक्षेसाठी रोज १८६ उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली. पनवेल प्रादेशिक परिवहन विभागामार्फत इरादापत्र देताना आकारलेल्या शुल्कापोटी शासनाच्या तिजोरीत सुमारे १ कोटी ५४ लाख ८० हजार रु पयांची भर पडली आहे. मात्र मुलाखतीला हजर न राहणाऱ्यांना पुन्हा बोलवण्यात येणार असल्याचे आरटीओने स्पष्ट केले आहे. जे अर्जदार उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी सोमवार ७ मार्चला सकाळी १० वाजता कागद पत्रांसह कळंबोली येथील लोखंड व पोलाद बाजारजवळील हॉल क्र मांक २ जवळ उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परिवहनमार्फत २०१६ मध्ये एक लाख नवीन परिमट वाटप कार्यक्रम जाहीर झाल्यावर ७ जानेवारीपर्यंत आॅनलॉइन पद्धतीने अर्ज मागवले होते. तर १२ जानेवारीला ड्रॉ काढला. या वेळी पनवेल आरटीओ विभागातील १११६ जणांना परवान्याची लॉटरी लागली. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार ते शनिवार असे सहा दिवस पारदर्शक पद्धतीने मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी आॅन दी स्पॉट इरादापत्र देण्यात आले.
सहा दिवसांत ९६५ जणांना इरादापत्रांचे वाटप केले आहे. यासाठी परवाना शुल्क १ हजार आणि अतिरिक्त १५ हजार असे १६ हजार
रु पये प्रत्येक उमेदवाराकडून घेण्यात आले. सहा दिवसांत १ कोटी ५४ लाख ८० हजार रु पये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. (प्रतिनिधी)