भिवंडी वसई मार्गावरील ट्रेन उशिरा येत असल्याने प्रवासी संतप्त
By नितीन काळेल | Published: August 30, 2022 03:34 PM2022-08-30T15:34:48+5:302022-08-30T15:35:33+5:30
भिवंडीकरांना वाहतूक कोंडीचा नेहमीच त्रास होत असतो. या वाहतूक कोंडीच्या त्रासातून भिवंडीकरांची सुटका करण्याचे काम भिवंडी वसई या मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाला जोडणाऱ्या मार्गीकेतून होत असते.
भिवंडी:दि.३०-
भिवंडीकरांना वाहतूक कोंडीचा नेहमीच त्रास होत असतो. या वाहतूक कोंडीच्या त्रासातून भिवंडीकरांची सुटका करण्याचे काम भिवंडी वसई या मध्य व पश्चिम रेल्वे मार्गाला जोडणाऱ्या मार्गीकेतून होत असते. मात्र सध्या भिवंडी वसई मार्गावर येजा करणाऱ्या डोंबिवली बोईसर या लोकल ट्रेनला रोज उशीर होत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.
मध्य व रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी पनवेल ते बोईसर असा रेल्वे मार्ग रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला असून या मार्गावर मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर भिवंडी रोड रेल्वे स्टेशन हे मालवाहतूकीचे मुख्य केंद्र बनल्याने या मार्गावर मालगाड्या मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात. तर प्रवाशांच्या सोयीसाठी या मार्गावर अवघ्या आठ रेल्वे गाड्या वेळा वेळाने सोडण्यात येत असतात.
या मार्गावरून जाणारी डोंबिवली बोईसर ही ट्रेन सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी भिवंडी रोड रेल्वे स्थानकावर येत असते मात्र मंगळवारी हि ट्रेन तब्बल ४० मिनिटे उशिराने भिवंडी रोड रेल्वे स्थानकांवर पोहोचली.त्यामुळे या ट्रेनवर अवलंबून असणाऱ्या अनेक चाकरमान्यांसह विदयार्थी व प्रवाशांचे मोठे हाल झाले. विशेष म्हणजे ही ट्रेन उशिराने येऊनही या मार्गावरील कामन रोड रेल्वे स्थानकावर तब्बल एक ते दीड तास थांबली.त्यामुळे प्रवाशांची मोठी कोंडी झाली होती.याठिकाणी प्रवाशांनी देखील काही काळ ट्रेन रोखून धरली होती.त्यामुळे या ठिकाणी कबी काळ तानावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या ट्रेनला रोजच्या होणाऱ्या उशिरामुळे विद्यार्थी व प्रवाशांना मोठा त्रास होत असून मालगाड्या जाण्यासाठी स्टेशन यंत्रणा प्रवासी रेल्वे ट्रेन ला रोखून धरले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे.यासंदर्भात भिवंडी रोड रेल्वे स्थानकाशी संपर्क केला असता कधी कधी ट्रेनला उशीर होत असतो मात्र त्याचे नेमकी कारण वरिष्ठ अधिकारी सांगू शकतील अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.त्यामुळे या मार्गावरील लोकल फेऱ्यांच्या नियोजित वेळेकडे आतातरी रेल्वे प्रशासन लक्ष देणार का असा सवाल प्रवासी करत आहेत.