ठाण्यात पुढच्या वर्षापासून वाढणार पासिंगचा ताण, मागेल त्याला रिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 12:15 AM2019-03-07T00:15:55+5:302019-03-07T00:16:01+5:30
‘मागेल त्याला रिक्षा परवाना’मुळे ठाणे परिवहन विभागामध्ये रिक्षांची संख्या २०१७-१८ मध्ये जवळपास ५० हजारांच्या घरात पोहोचली आहे.
ठाणे : ‘मागेल त्याला रिक्षा परवाना’मुळे ठाणे परिवहन विभागामध्ये रिक्षांची संख्या २०१७-१८ मध्ये जवळपास ५० हजारांच्या घरात पोहोचली आहे. यामध्ये २० हजार नवीन रिक्षांचा समावेश आहे. सध्या नव्या रिक्षांचे आठ वर्षांपर्यंत दोन वर्षांनी पासिंग करण्याचे आदेश असल्याने ताण कमी झाला आहे. मात्र, २०२० पासून नव्या-जुन्या रिक्षा एकत्रित पासिंगला येणार असल्याने कामाचा ताण दुपटीने वाढून आरटीओ अधिकाऱ्यांची डोकेदुखी ठरणार आहे. दिवसाला १८० रिक्षांचे पासिंग करावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सद्य:स्थितीत ठाणे आरटीओमार्फत दिवसाला ९० रिक्षांचे पासिंग होत आहे. त्यासाठी दोन अधिकारी नेमण्यात आले असून एका अधिकाऱ्याकडे दिवसाला ४५ रिक्षा पासिंगची जबाबदारी आहे. याचदरम्यान पासिंगला येणाºया वाहनांची नोंदणी होत असल्याने दिवसाला किती रिक्षा आहेत, याची माहिती कळते. त्यानुसार, अधिकाऱ्यांची नेमणूक के ली
जाते. सध्या दोन अधिकारी तैनात असून भविष्यात चार अधिकाºयांची गरज भासणार असल्याचे सूत्रांनी
सांगितले.
>५० हजार रिक्षा
आॅगस्ट २०१७-आॅगस्ट २०१८ दरम्यानच्या ‘जेएच’ आणि ‘जेक्यू’ या मालिकांतील अशा सुमारे ५० हजार रिक्षा रस्त्यावर आहेत. त्यामध्ये आता पासिंग झालेल्या नव्या रिक्षा दोन वर्षांनी म्हणजे २०२० ला पासिंगसाठी येणार असल्याने त्याचा ताण वाढणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.