पासपोर्टसाठी पडताळणी आता होणार घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 03:29 AM2017-12-28T03:29:07+5:302017-12-28T03:29:10+5:30
ठाणे : प्रवास, शिक्षण अथवा पर्यटनासाठी परदेशात जाणाºयांसाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी पारपत्रपडताळणी (पासपोर्ट) अत्यंत सोपी केली आहे.
जितेंद्र कालेकर
ठाणे : प्रवास, शिक्षण अथवा पर्यटनासाठी परदेशात जाणाºयांसाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी पारपत्रपडताळणी (पासपोर्ट) अत्यंत सोपी केली आहे. संबंधित अर्जदाराने पासपोर्टसाठी आॅनलाइन अर्ज केल्यानंतर पोलीस संपूर्ण माहिती घेण्यासाठी टॅब घेऊनच घरी पोहोचणार आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात जाण्याचीही गरज नसल्यामुळे लोकांचा वेळ आणि खर्चही वाचणार असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
केंद्र शासनाच्या गतिमान आणि पारदर्शक शासन योजनेंतर्गत पासपोर्ट विभागाने ही योजना राबवण्याचे देशभरातील पोलीस यंत्रणांना सूचित केले आहे. राज्यात काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये ही योजना कार्यान्वित झाली असून त्यामध्ये ठाणे ग्रामीणचाही समावेश आहे. त्यानुसार, सुमारे अडीच लाख रुपये खर्चातून १७ पोलीस ठाण्यांचे प्रत्येकी दोन कर्मचारी आणि अधीक्षक कार्यालयासाठी एक असे १८ टॅब खरेदी करण्यात आले. पासपोर्टच्या पडताळणीसाठी पोलिसांनी ‘एम पासपोर्ट’ हे अॅप सुरू केले आहे. पडताळणीच्या कामासाठी दोनदोन महिनेही लागत होते. आता हे काम अवघ्या एका आठवड्यात तेही खर्चाविना केले जात आहे.
>कागदपत्रेही जागीच स्कॅन केली जातात
पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर त्याची फाइल तो वास्तव्यास असलेल्या ठाणे ग्रामीणच्या संबंधित पोलीस ठाण्यात पाठवली जाते.
ती आल्यानंतर त्या पोलीस ठाण्याचा पोलीस कर्मचारी संबंधितांच्या घरी जाऊन वास्तव्याची तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी करतात. त्याच वेळी त्याच्याविरुद्ध कोणता गुन्हा वगैरे दाखल आहे किंवा कसे, याचीही माहिती घेतली जाते.
ही माहिती घेतल्यानंतर जागीच त्याचा फोटो घेऊन कागदपत्रेही टॅबद्वारेच स्कॅन केली जातात.
ही माहिती दुसºयाच दिवशी पोलीस अधीक्षक कार्यालयात पाठवली जाते. साधारण तीन ते पाच दिवसांमध्ये ही संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर संबंधितांना आॅनलाइन पडताळणी झाल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.
>पूर्वी पासपोर्टच्या पडताळणीसाठी नागरिकांना पोलीस ठाण्यात बºयाच फेºया माराव्या लागत होत्या. आता केंद्र शासनाच्या गतिमान आणि पारदर्शक शासन धोरणांतर्गत पासपोर्ट कार्यालयाच्या मदतीने पासपोर्टसाठी ही घरपोच सेवा नागरिकांना ठाणे ग्रामीणच्या १७ पोलीस ठाण्यांत सुरू केली आहे. त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षणही दिले आहे. घरी आलेल्या पोलिसांकडून सौजन्याची वागणूक मिळाल्यानंतर पोलिसांची प्रतिमाही सुधारण्यास मदत होते. कामात गती येऊन लोकांचाही वेळ वाचतो. शिवाय, कामातही पारदर्शकता येते.
- डॉ. महेश पाटील, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण