पासवर्ड हॅक करून दोघांना आॅनलाइन गंडा , ९० हजार लंपास : अद्याप अटक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:01 AM2017-10-12T02:01:36+5:302017-10-12T02:01:47+5:30

वागळे इस्टेट भागातील दोन खातेदारांच्या बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून आॅनलाइनद्वारे सुमारे ९० हजारांना गंडा घालणा-यांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Password hacked and hacked both online, 90 thousand laps: still not arrested | पासवर्ड हॅक करून दोघांना आॅनलाइन गंडा , ९० हजार लंपास : अद्याप अटक नाही

पासवर्ड हॅक करून दोघांना आॅनलाइन गंडा , ९० हजार लंपास : अद्याप अटक नाही

Next

ठाणे : वागळे इस्टेट भागातील दोन खातेदारांच्या बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून आॅनलाइनद्वारे सुमारे ९० हजारांना गंडा घालणा-यांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असून कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
वागळे इस्टेटच्या लुईसवाडी भागात राहणाºया ६५ वर्षीय महिलेने आपल्या बँक खात्याचा पासवर्ड कोणालाही दिला नव्हता. तरीही, ८ आॅक्टोबर रोजी दुपारी १.५५ ते १.५९ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या खात्यातून एका भामट्याने बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून त्यांच्या खात्यातून ५० हजार ९९७ रुपयांची खरेदी करून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी १० आॅक्टोबर रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक सीताराम वाघ हे अधिक तपास करीत आहेत.
अन्य एका घटनेत रहेजा गार्डन या इमारतीमधील रहिवासी मोंटू गज्जर (३८) यांच्या एचडीएफसी बँकेच्या क्रेडिटकार्ड क्रमांकाचा पासवर्ड इंटरनेटद्वारे एका भामट्याने हॅक केला. त्याच आधारे एटीएमद्वारे त्यांच्या खात्यातून चार वेळा प्रत्येकी १० हजार रुपये असे ४० हजार रुपये काढण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनीही १० आॅक्टोबर रोजी याप्रकरणी
वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल
केला आहे. पोलीस निरीक्षक
अनघा देशपांडे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Password hacked and hacked both online, 90 thousand laps: still not arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onlineऑनलाइन