गेली 26 वर्षापासून फळेगांवात नवरात्रीत घुमतोय टाळ मृदूंगांचा नाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 06:30 PM2019-09-29T18:30:49+5:302019-09-29T18:30:56+5:30
रविवारच्या 29 तारखेला घटस्थापना झाली असून पुढील नऊ दिवस नवरात्र उत्सवाची धामधुम सर्व देशभर सुरु रहाणार आहे
उमेश जाधव
टिटवाळाः- नवरात्र उत्सव म्हंटला की सर्वत्र डिजेच्या तालावर थिरकणारी तरूणाईची पाऊले. दांडियाच्या रासक्रिडेत रममान होऊन झालेली जनता असे चित्र सर्वत्र पहावयास मिळते. परंतु कल्याण तालुक्यातील फळेगांवात जरिमरी मित्रमंडळाच्या नवरात्रो उत्सवात गेली 26 वर्षापासून घुमतोय टाळ मृदूंगाचा गजर ऐकायला मिळतोय.
रविवारच्या 29 तारखेला घटस्थापना झाली असून पुढील नऊ दिवस नवरात्र उत्सवाची धामधुम सर्व देशभर सुरु रहाणार आहे. डिजेचा कर्कश आवाजावर ताल व ठेका धरून तरूणाईसह, लहानांन पासून अबाल वृध्दांपासून सर्वच गरब्याच्या ठेक्यावर नाचतांना दिसून येतील. परंतु कल्याण तालुक्याच्या फळेगावात मात्र गेला 26 वर्षापासून वेगळेच चित्र पाहावयास मिळते. येथील जरिमरी मित्र मंडळात नवरात्रात दांडिया ऐवजी टाळ मृदूंगाचा आवाज घुमत असतो. येथे रोज भजन, किर्तन, हरिपाठ, प्रवचन अशा प्रकारचे विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात. या मंडळाचे विशेष म्हंणजे की सर्व कार्यकर्ते तरूण असून देखील दांडिया ऐवजी धार्मिक कार्यक्रम राबविले जातात. महाराष्ट्रातील नामांवत किर्तनकारांची किर्तने व प्रवचने या ठिकाणी रोज होत आसतात. यंदा देखील फळेगांवातील नवरात्र उत्सवात नऊ दिवस टाळ-मृदूंगाचा नाद घुमणार आहे.
आम्हाला आमच्या तरूण मुलांचा अभिमान आहे. गेली 26 वर्षा पासून आमची मुलं हा कार्यक्रम राबवित आहेत. अशाच प्रकारे हा कार्यक्रम अखंड तेवत रहाणार आहे. आम्ही देखील त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहोत. असे मत मंडळाचे जेष्ठ सल्लागार कमलाकर महाराज व कृष्णा महाराज जाधव यांनी व्यक्त केले.