व्हिडीओ व्हायरल : सेंटरमध्ये रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:50 PM2020-06-11T23:50:46+5:302020-06-11T23:50:57+5:30

व्हिडीओ व्हायरल : अहवाल येण्यापूर्वीच ‘पॉझिटिव्ह’सारखी वागणूक

Patient condition at Covid Center | व्हिडीओ व्हायरल : सेंटरमध्ये रुग्णांचे हाल

व्हिडीओ व्हायरल : सेंटरमध्ये रुग्णांचे हाल

Next

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे हाल होत असल्याचा व्हिडीओ एका रुग्णाने सोशल मीडियावर प्रसृत केला आहे. त्यात त्याच्यासह अन्य १९ रुग्णांचे हाल होत असल्याची व्यथा त्याने मांडली आहे. यामुळे हे कोविड सेंटर वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

रुग्ण व त्याच्या पत्नीसह त्यांच्या आसपासच्या १९ जणांना महापालिकेच्या आरोग्य पथकाने कोरोना संशयित म्हणून भिवंडी बायपास येथील टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटरमध्ये मंगळवारी सायंकाळी भरती केले आहे. या रुग्णाने व्हिडीओत आरोप केला की, त्याच्या पत्नीवर उपचार करण्यासाठी डॉक्टर, नर्स आलेली नाही. पत्नी घरात अगोदर काही गोळ््या घेत होती. त्याची फाईल सोबत नेली आहे. ही फाईल पाहून सुरु असलेल्या गोळ््या घेण्यास नकार दिला आहे. याठिकाणी स्वच्छता व चहा-नाश्ता देणारे कामगार रुग्णांसोबत गैरवर्तन करीत आहेत. संशयित रुग्णांची अद्याप चाचणी झालेली नाही. ज्यांचे अहवाल येणे बाकी आहे त्यांना कोरोना पॉझिटीव्ह असल्याची वागणूक दिली जात आहे.
आ. गणपत गायकवाड म्हणाले की, कोरोनाचा काहींनी बिझनेस केला आहे. यापूर्वी आमंत्रा येथील सेंटरबाबत तक्रारी केल्यानंतर प्रशासनाकडून योग्य सोयीसुविधा पुरविल्या जात असल्याचा दावा केला होता. एका रुग्णाने असुविधांचा पाढा सोशल मीडियावर मांडल्यावर प्रशासनाकडे विचारणा केली असता वैद्यकीय अधिकारी हे परिचारिकांच्या मुलाखती घेण्यात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.

यंत्रणेने लक्ष द्यावे
काही दिवसांपूर्वी एका रुग्णाने आमंत्रा कोविड सेंटरमध्ये पसरलेल्या अस्वच्छतेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यापाठोपाठ आता अन्य एका रुग्णाने येथील असुविधांबाबत व्यथा मांडल्याने यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Patient condition at Covid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे