रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर, मृत्युदरही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 12:51 AM2020-08-20T00:51:48+5:302020-08-20T00:52:07+5:30

नगरपालिकेच्या दंत महाविद्यालयातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल ९६ टक्क्यांवर गेला आहे. तर, येथील रुग्णालयाचा मृत्युदर अर्ध्या टक्क्याच्याही खाली आहे.

Patient recovery rate at 90%, mortality rate also low | रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर, मृत्युदरही कमी

रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर, मृत्युदरही कमी

Next

अंबरनाथ : कोरोना नियंत्रणासाठी अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या वतीने बाधितांचा वेळीच घेतलेला शोध, आग्रही चाचणी, अलगीकरण आणि विलगीकरण यंत्रणेचे यशस्वी नियोजन आणि बाधित रुग्णांवर प्रभावी उपचारांमुळे शहरात रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल ९० टक्क्यांवर गेला आहे. नगरपालिकेच्या दंत महाविद्यालयातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर तब्बल ९६ टक्क्यांवर गेला आहे. तर, येथील रुग्णालयाचा मृत्युदर अर्ध्या टक्क्याच्याही खाली आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, याकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. शहरात आजपर्यंत एकूण ११ हजार ४५२ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, शहरात एकूण चार हजार ५०२ बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरातील एकूण रुग्णांपैकी तब्बल चार हजार ७९ रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर, शहरात एकूण १७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दंत महाविद्यालयातील कोविड रुग्णालयात आजपर्यंत दोन हजार ५४ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. यातील एकूण एक हजार ९८० रुग्ण हे उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. या रुग्णालयातील रुग्ण बरे होण्याचा दर हा तब्बल ९६ टक्के इतका आहे. मागील दोन महिन्यांत या रुग्णालयात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हा दर अवघा ०.१९ इतका आहे. यासोबतच शहरातील एकूण रुग्णांचा बरे होण्याचा दरही ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र, शहरातील कोरोनाचा मृत्युदर हा अजूनही पालिकेची चिंता वाढविणारा आहे. हा मृत्युदर कमी करण्यासाठी पालिका प्रयत्न करीत आहे.
>शहरातील बाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी पालिकेने स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे. त्यासोबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात असल्याने संसर्गाचे प्रमाण काही अंशी रोखण्यात यश येताना दिसत आहे.
- प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी

Web Title: Patient recovery rate at 90%, mortality rate also low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.