भिवंडीतील शेलार ग्राम पंचायतीच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मनोधैर्य नक्कीच वाढणार - डॉ. मोहन नळदकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 04:04 PM2021-05-24T16:04:43+5:302021-05-24T16:11:14+5:30

Covid Center of Shelar Gram Panchayat in Bhiwandi : शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच किरण चन्ने यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील ग्राम पंचायतीने उभारलेल्या एकमेव कोविड सेंटरचे उदघाटन सोमवारी पार पडले यावेळी ते बोलत होते.

Patients' morale will definitely increase in Covid Center of Shelar Gram Panchayat in Bhiwandi - Dr. Mohan Naladkar | भिवंडीतील शेलार ग्राम पंचायतीच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मनोधैर्य नक्कीच वाढणार - डॉ. मोहन नळदकर

भिवंडीतील शेलार ग्राम पंचायतीच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मनोधैर्य नक्कीच वाढणार - डॉ. मोहन नळदकर

googlenewsNext

नितिन पंडीत

भिवंडी - कोरोना रुग्णांना औषधोपचाराबरोबरच मानसिक आधाराची व सहानुभूतीची अधिक गरज असते शारीरीक स्वस्था बरोबरच रुग्णाचे मानसिक स्वास्थ चांगले असेल तर रुग्ण लवकर बरा होतो त्यातच शेलार ग्राम पंचायतीने निसर्गरम्य ठिकाणी उभारलेल्या कोविड सेंटरमुळे कोविड रुग्णांचे मनोध्येर्य वाढण्यास नक्कीच मदत होणार असून एकही रुग्णांचे मनोधैर्य खचणार नाही याची जबाबदारी कोविड सेंटर घेणार असल्याने त्याचा फायदा येथील रुग्णांना होऊन ते लवकरात लवकर बरे होऊन घरी सुखरूप जातील अशी प्रतिक्रिया भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या कोविड केअर सेंटरच्या उदघाटन व लोकार्पण प्रसंगी व्यक्त केली.

शेलार ग्राम पंचायतीचे सरपंच किरण चन्ने यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील ग्राम पंचायतीने उभारलेल्या एकमेव कोविड सेंटरचे उदघाटन सोमवारी पार पडले यावेळी ते बोलत होते. या कोविड केअर सेंटरचा उद्घाटन सोहळ्या प्रसंगी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील, तहसीलदार अधिक पाटील,जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, स्थानिक जिल्हा परिषद सदस्य अरुण भोईर, पंचायत समिती सदस्या अविता यशवंत भोईर, उप सरपंच ज्योत्स्ना भोईर आदी मान्यवर उपस्थितीत होते. 

भिवंडी ग्रामीण भागात कोरोना च्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना आरोग्य सेवांची कमतरता ओळखून शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच किरण चन्ने यांनी ग्रामनिधीसह लोकसहभागातून अवघ्या पंधरा दिवसात जिल्हा परिषद शाळेत ५० बेडचे कोविड सेंटर उभारले असून त्या ठिकाणी आरोग्य सेवा मोफत दिली जाणार असून या सेंटरचे इमारतीचे स्ट्रक्चरल व अग्नी व विद्युत यंत्रणेचे ऑडिट केल्या नंतर ही या सुसज्य सेंटरला जिल्हा प्रशासना कडून मान्यता न मिळाल्याने हे कोविड सेंटर चर्चेत आले होते . अखेर जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळून सोमवारी या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. 

दरम्यान या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार असून या पंचक्रोशीतील नागरिकांची गरज या केंद्रातून भागविली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करीत सध्या रुग्णांना मानसिक आधार देणे गरजेचे असून तो उत्तम उपचार आहे चांगलं वातावरण हेच कोरोना वर उत्तम इलाज ही भावना लक्षात घेऊन येथे तसे वातावरण या सेंटर मध्ये निर्माण केले आहे त्या बद्दल ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी प्रशासन यांचे डॉ. मोहन नळदकर यांनी आभार व्यक्त करीत जेथे जेथे गरज लागेल तेथे प्रशासन मदतीसाठी तयार असेल अशी ग्वाही देखील प्रांताधिकाऱ्यांनी दिली.

महाराष्ट्रातील कदाचित ग्रामपंचायतीने उभारलेले हे पहिले कोविड केअर सेंटर आहे. त्याच्या लोकार्पणाचे भाग्य आम्हाला लाभले परंतु भविष्यात या ठिकाणी कोविड सेंटर अत्याधुनिक सुसज्ज कसे होईल व येथील सर्वसामान्य रुग्णांना त्याचा लाभ कसा मिळेल यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या प्रयत्नांना सर्वांची साथ मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी केले. ग्रामीण भागातील लग्न सोहळ्यांवर लक्ष ठेवून त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे असल्याचे आवाहन याप्रसंगी तहसीलदार अधिक पाटील यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच किरण चन्ने यांनी माणूस जेव्हा जेव्हा संकटात असेल तेव्हा मदत करावी हे संस्कार आमच्यावर असल्याने कोरोना संकटात काम करण्याचे ठरविले. संवेदना नष्ट झाली तर कोणताही उपचार कामी येणार नाही. राजकारणापलिकडे जाऊन जेव्हा यावर मात करण्याचा विचार करू तेव्हाच त्यावर आपण मात करण्यात यशस्वी होऊ असे सांगत रुग्णांना मानसिक आधार देणे गरजेचे, आमचा संघर्ष हा नेहमी माणुसकीसाठी, न्यायसाठी असतो त्यामुळे या कार्यात सर्वांचे सहकार्य मिळत राहील अशी अपेक्षा शेलारचे सरपंच किरण चन्ने यांनी शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणाप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ भोईर यांनी केले.
 

Web Title: Patients' morale will definitely increase in Covid Center of Shelar Gram Panchayat in Bhiwandi - Dr. Mohan Naladkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.