लॉकडाऊनच्या काळात रुग्णांना मिळणार मोफत केसपेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 03:05 PM2020-04-04T15:05:39+5:302020-04-04T15:06:38+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्वच आरोग्य केंद्रावर गर्दी होत आहे. त्यामुळे केसपेपर काढण्यासाठी रांगा लावा त्यासाठी १० रुपये मोजावे लागत होते. मात्र आता रुग्णांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार नसल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.

Patients will get free haircut during lockdown | लॉकडाऊनच्या काळात रुग्णांना मिळणार मोफत केसपेपर

लॉकडाऊनच्या काळात रुग्णांना मिळणार मोफत केसपेपर

Next

ठाणे : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे साध्या आजारांवर उपचार घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. यासाठी महापालिकेने प्रभागसमितीनिहाय खाजगी डॉक्टरांच्या सहाय्याने बाह्यरु ग्ण विभाग (ओपीडी) सुरू केले आहेत. यासाठी रु ग्णांकडून १० रु पये इतकी केसपेपर फी आकारण्यात येत होती. रु ग्णांना तात्काळ उपचार मिळावेत व गर्दी टाळावी यासाठी लॉकडाऊन असेपर्यत रु ग्णांकडून केसपेपरसाठी १० रु पये फी आकारली जावू नये असे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रान्वये महापालिका आयुक्तांना दिले, यामुळे रु ग्णांना दिलासा मिळाला आहे.
    लॉकडाऊन परिस्थीतीत नागरिकांना साध्या आजारांवर देखील उपचार मिळावेत यासाठी महापालिकेच्या विविध भागात आरोग्यकेंद्र सुरू करण्यात आले आहेत. महापालिका आरोग्यकेंद्रातील सर्व डॉक्टर्स हे कोरोनाचा प्रतिबंध करण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे खाजगी डॉक्टरांच्या मदतीने या आरोग्यकेंद्रात रु ग्णांना सेवा दिली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असून ते देखील रु ग्णांमध्ये सोशल डिस्टन्सींग पाळले जावे यासाठी आरोग्यकेंद्रात मदत करीत आहेत. या आरोगयकेंद्रात येणाऱ्या रु ग्णांकडून १० रु पये केसपेपरची फी आकारण्यात येत असल्यामुळे काही व्यक्ती हेतुपुरस्सर याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सद्यस्थीतील रु ग्णांकडून केसपेपरची फी आकारण्यात येवू नये अशी मागणी म्हस्के यांनी आयुक्तांना पत्रान्वये आयुक्तांना केली होती. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी देखील तात्काळ ही मागणी मान्य करु न आरोगयकेंद्रांना सूचना देवून लॉकडाऊन असेपर्यत केसपेपरची फी न आकारण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत महापौरांनी आयुक्त यांच्यासह कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी काम करीत असलेल्या महापालिकेच्या सर्व अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस यांच्या कामाची दखल घेवून त्यांचे कौतुक केले आहे.
सद्यस्थितीत सर्वजण कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाला स्वेच्छेने मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे रु ग्णांना चांगली सेवा मिळावी, व सोशल डिस्टान्सींग पाळले जावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे रु ग्णांना निश्चीतच दिलासा मिळेल असे म्हस्के यांनी नमूद केले. तसेच या कामी पुढाकार घेवून सहकार्य करणाºया खाजगी डॉक्टर्स व सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्ते करीत असलेल्या कामाचे महापौरांनी कौतुक केले आहे.

 

Web Title: Patients will get free haircut during lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.