उल्हासनगरातील वालधुनी नदीची पेट्रोलिंग, नदीच्या पाण्याच्या तीव्र वासाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:12 PM2020-09-30T17:12:21+5:302020-09-30T17:12:38+5:30
उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत टॅंकर माफिया केमिकल सोडत असल्याने, नदी किनाऱ्यावरील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीत केमिकल टाकणाऱ्याचा छेडा लावण्यासाठी पालिका अधिकाऱ्यास ह, प्रदूषण मंडळाचे अधिकारी, पोलिस व स्थानिक नगरसेवकांनी गेल्या दोन दिवसापासून रात्रीला नदी किनारी गुप्तपणे पेट्रोलिंग केली. मात्र हाती काहीच लागले नाही. अखेर प्रदुषण मंडळाचे छडा लावण्याची विनंती नगरसेवक टोनी सिरवानी यांनी केली.
उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत टॅंकर माफिया केमिकल सोडत असल्याने, नदी किनाऱ्यावरील हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. नदी पात्रात केमिकल टाकले जात असल्याने, नदीतील पाण्याला उग्र दर्पाचा वास येवून नागरिकांना चक्कर येणे, डोळे दुखी, उलट्या, त्वचाच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यापूर्वी असे प्रकार अनेकदा घडल्याने नदी किनाऱ्यावरील नागरिक भीतीच्या छायाखाली आहेत. गेल्या दोन दिवसापासून वालधुनी नदीच्या पात्रातून तीव्र वासात वाढ झाल्याने नागरिकांनी स्थानिक नगरसेवक टोनी सिरवाणी, कविता पंजाबी यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्याकडे धाव घेवून झालेला प्रकार कथन केला. तसेच पाण्याच्या तीव्र वासाने नागरिक त्रस्त झाले आहेत.
महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी सहायक आयुक्त गणेश शिंपी, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केनी, एकनाथ पवार यांना बोलावून रात्रीला वालधुनी नदी किनारी पोलिस, स्थानिक नगरसेवक व प्रदुषन मंडळाच्या अधिकारी यांच्या सोबत गस्त घालण्याचे सुचविले. सोमवारी व मंगळवारी रात्री गस्त घातली असुन हाती काहीच लागले नसल्याची प्रतिक्रिया नगरसेवक टोनी सीरवानी यांनी दिली. तसेच नदीचे प्रदुर्षण करणाऱ्यावर कारवाई होण्यासाठी प्रदुषन मंडळाने अधिक सक्रिय होण्याची गरज असल्याची माहिती सिरवानी यांनी दिली. तसेच रात्रीची महापालिकेने गस्त सुरू केल्याची माहिती टँकर केमिकल माफिया यांना खबरी पर्यंत मिळाल्याने गस्त दरम्यान पथकाला काही एक मिळाले नसल्याची माहिती दिली.
वालधुनी नदी वरदान नव्हे शाप?
शहरातून जाणारी वालधुनी नदी वरदान ठरण्या ऐवजी शापित निघाल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. यापूर्वी नदीतील तीव्र वासाने शेकडो नागरिकांना फटका बसला असुन त्यांना रूग्णालयात उपचार घ्यावे लागले. नदीत केमिकल टाकणाऱ्या टँकर माफियांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले. मात्र मोठी कारवाई अध्यापर्यंत झाली नसल्याचा आरोप सिरवानी यांनी केला.