नवीन ठाण्याचे स्नप्न दाखवून फसवणूक करणा-या पटवा बंधूंना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 09:44 PM2017-11-18T21:44:38+5:302017-11-18T21:44:49+5:30

भिवंडी तालुक्यातील खारबाव,पाये,पायगाव या गावात नवीन ठाण्याचे स्वप्न दाखवून ग्राहकांची फसवणूक करणा-या सहा भागीदार बिल्डरांपैकी ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली

Patwa brothers arrested for cheating the new station | नवीन ठाण्याचे स्नप्न दाखवून फसवणूक करणा-या पटवा बंधूंना अटक

नवीन ठाण्याचे स्नप्न दाखवून फसवणूक करणा-या पटवा बंधूंना अटक

Next

भिवंडी-तालुक्यातील खारबाव,पाये,पायगाव या गावात नवीन ठाण्याचे स्वप्न दाखवून ग्राहकांची फसवणूक करणा-या सहा भागीदार बिल्डरांपैकी ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असुन त्यांना भिवंडीतील न्यायालयांत हजर केले असता न्यायालयाने २२ नोव्हेबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

तालुक्यातील खारबाव ,पाये व पायेगाव या तीन गावात महावीर सिटी , महावीर सृष्टी , महावीर ब्लॅक टी असे तीन इमारतींचे प्रकल्प सुरु होते .तर या प्रकल्पाचे नवीन ठाणे अशी जाहिरातबाजी करून ग्राहकांना आकर्षित केले.त्यामुळे ४३००ग्राहकांनी सुमारे २२२ कोटी १८ लाखाची गुंतवणूक केल्याची माहिती सूत्राने दिली.मात्र या बिल्डरांनी सदर ठिकाणी इमारती बांधताना महसूल विभागाने दिलेल्या अटी-शर्थीचा भंग केल्याप्रकरणी काही इमारतींवर तोडू कारवाई केली.त्यानंतरही दिलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांनी विकत घेतलेल्या गाळ्याचा ताबा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

त्यामुळे त्यांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात सहा बिल्डर भागीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी लोकमतमध्ये(१७ नोव्हेंबर) वृत्त छापून आल्यानंतर ठाण्याच्या ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करीत सहा बिल्डर भागीदारांपैकी राजेश पटवा व विनोद पटवा यांना अटक केली. त्यांना भिवंडी न्यायालयांत हजर केले असता २२ नोव्हेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.या घटनेने परिसरांतील बिल्डरांचे धाबे दणाणले असून याचा धसका गुंतवणूकदारांनी घेतला आहे.

Web Title: Patwa brothers arrested for cheating the new station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक