दुरुस्तीनंतर लगेचच उखडले पेव्हर ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 03:07 AM2017-12-27T03:07:12+5:302017-12-27T03:07:13+5:30
ठाणे : दुरुस्तीसाठी मागील चार दिवसापासून बंद असलेला विटावा सब वे मंगळवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला केला.
ठाणे : दुरुस्तीसाठी मागील चार दिवसापासून बंद असलेला विटावा सब वे मंगळवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला केला. मात्र, तो खुला होताच बसवलेले पेव्हर ब्लॉक अक्षरश: उखडले गेल्याने आधीच चार दिवस वाहतूक कोंडीत काढणा-या ठाणेकरांवर पुन्हा एकदा तिचा सामना करावा लागला. पेव्हर ब्लॉक उखडले गेल्याने या मार्गावरील वाहतूकही मंदावली होती. चार दिवस ठाणे महापालिकेने केवळ पेव्हर ब्लॉक बसवले असून दुरुस्ती केल्यानंतर पहिल्याच दिवशी ते निघाल्याने या कामाच्या दर्जाविषयीच प्रश्नचिन्ह उपस्थित राहीले आहे.
चार दिवसाचा ब्लॉक घेऊन विटावा सबवेची दुरु स्ती करण्यात आली. मात्र, सिमेंट काँक्रिटीकरण न करता या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. येथील वाहतूककोंडी ही अनेक वर्षांपासूनची आहे. असे असताना सब वे खाली पडलेले खड्डे बुजविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिसूचना काढून तो चार दिवसांसाठी बंद करून दुरु स्तीचे काम सुरू केले होते. या ठिकाणी पाणी साचत असल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे होतात. कायम अवजड आणि लहान वाहनांची वाहतूक सुरूच राहत असल्यामुळे दुरु स्तीसाठी हा रस्ता बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. हे काम महापालिकेने मंगळवारी संपवून सकाळी सहा वाजता सब वे वाहतुकीसाठी सुरू केला. मात्र, काहीच तासातच पेव्हर ब्लॉक उखडले गेल्याने या भागात वाहतूककोंडी सुरू झाली.
या सबवे चे हे काम सुरू असताना या ठिकाणी राहत असलेले मनसे पदाधिकारी यांनी ठाणे महानगर पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला एक पत्र २२ डिसेंबर ला देऊन दुरु स्ती ही सिमेंट काँक्रिटीकरणाने करावी, न्यायालयाच्या बंदीचे आदेश असलेले पेव्हर ब्लॉक वापरू नयेत असे पत्र दिले होते. तरीही प्रशासनाने दुरु स्तीसाठी पेव्हर ब्लॉकचाच वापर केला. यामुळे आता दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मनसे पदाधिकारी सुशांत सुर्यराव आणि भाजप पधाधिकारी मनोहर सुखदरे यांनी केली आहे. यावेळी अधिकारी आणि सुखदरे यांच्यात वादही झाला. नंती त्यांना कळवा पोलीस ठाण्यात नेऊन काही वेळाने सोडण्यातदेखील आले. दरम्यान दुपारी येथील वाहतूक कमी झाल्यानंतर दीड तासाचा पुन्हा ब्लॉक घेऊन दुरुस्तीचे काम पुन्हा सुरू होते. परंतु, आता कामाबाबत मात्र पुन्हा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
ज्या ठेकेदाराने हे काम केले त्याच्या इतर ठिकाणच्या कामांचीही चौकशीचीमागणीहोतआहे.