३१  जानेवारीपर्यंत मालमत्ता कर भरा आणि दंडामध्ये १०० टक्के सूट मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 04:44 PM2021-01-05T16:44:30+5:302021-01-05T16:45:51+5:30

कोविडच्या पार्श्वभूमीवर जे नागरिक थकीत करांसह आपला संपूर्ण मालमत्ता कर ३१ जानेवारीपर्यंत भरतील, त्यांना दंडमध्ये १०० टक्के सूट देण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे.

Pay property tax by January 31 and get 100% rebate on fines | ३१  जानेवारीपर्यंत मालमत्ता कर भरा आणि दंडामध्ये १०० टक्के सूट मिळवा

कोविड च्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचा निर्णय

Next
ठळक मुद्देकोविड च्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे :कोविडच्या पार्श्वभूमीवर जे नागरिक थकीत करांसह आपला संपूर्ण मालमत्ता कर ३१ जानेवारीपर्यंत भरतील, त्यांना दंडमध्ये १०० टक्के सूट देण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने सर्वत्र लॉकडाऊन घोषित केले होते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले होते. ही बाब लक्षात घेऊन मालमत्ता करावर कलम ४१ (१) अन्वये आकारलेल्या व्याजामध्ये १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
या निर्णयानुसार जे मालमत्ता धारक आपला मालमत्ता कर (संपूर्ण थकबाकीसह ३१ जानेवारी २०२१ पर्यंत एक रकमी भरतील त्यांना दंडामध्ये संपूर्ण सवलत देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत नागरिकांना आपला मालमत्ता कर आॅनलाईन पद्धतीने तसेच डीजी ठाणे अ‍ॅपच्या माध्यमातून भरता येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या संकलन केंद्रावरही रोख, धनादेश, धनाकर्ष, क्र ेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातूनही मालमत्ता कर भरण्याची सुविधा निर्माण केली आहे. महापालिकेची संकलन केंद्र सोमवार ते शुक्र वार सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत तर सार्वजनिक सुट्टी आणि सर्व शनिवारी सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आल्याचीही माहिती पालिका सूत्रांनी दिली.

 

Web Title: Pay property tax by January 31 and get 100% rebate on fines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.