वीज वितरण कंपनीची थकबाकी केली चुकती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:40 AM2021-03-31T04:40:49+5:302021-03-31T04:40:49+5:30

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या कंपनीकडे वीज बिलापोटी असलेली थकबाकीची ...

Payment of arrears to the power distribution company | वीज वितरण कंपनीची थकबाकी केली चुकती

वीज वितरण कंपनीची थकबाकी केली चुकती

Next

कल्याण : आंबिवली मोहने येथील एनआरसी कंपनीची जागा अदानी समूहाने लिलावात घेतली आहे. या कंपनीकडे वीज बिलापोटी असलेली थकबाकीची रक्कम अदानी समूहाने चुकती केली आहे. त्यासाठी १ कोटी ६९ लाख रुपयांचा धनादेश वीज वितरण कंपनीला मंगळवारी सुपूर्द करण्यात आला.

एनआरसी कंपनी २००९ साली आर्थिक कारणास्तव बंद पडली. त्यामुळे वीज बिलाचा नियमित भरणा कंपनीकडून केला जात नव्हता. परिणामी, कंपनीचा वीज पुरवठा २०१६ साली वीज वितरण कंपनीने खंडित केला होता. अनेक निवेदने प्राप्त झाल्यावर ज्या पंप हाउसमधून पाणीपुरवठा केला जातो, त्या लाइनचा पुरवठा महावितरणने सुरू केला होता. मात्र कंपनीकडून पंप हाउसचेही बिल भरले जात नव्हते. त्या कारणावरून कंपनी आणि वीज वितरण कंपनीत वादविवाद सुरू होते. दरम्यान, आर्थिक संस्थांनी एनआरसीविरोधात २०१८ मध्ये दिवाळखोरी आणि नादारी कायद्याच्या अंतर्गत राष्ट्रीय कंपनी कायदा लवादामध्ये कर्ज वसुलीचा दावा दाखल केला होता. लवादाच्या आदेशानुसार कोर्टाने जो नादारी आदेश काढला, त्या आधीची सर्व देणी रद्दबातल ठरतात. त्यामुळे आयबीसी कायद्याच्या तरतुदीनुसार कोर्टाच्या नादारी आदेशाच्या दिवसापासून जे विजेचे बिल असेल तेवढेच बिल अदानी समूह देणे लागतो. त्यानुसार अदानी समूहाने वीज वितरण कंपनीकडे त्यांचे म्हणणे मांडले. त्यानंतर वीज वितरण कंपनीने अदानी समूहाला १ कोटी ६९ लाख रुपयांचे बिल पाठविले होते.

-----------------------------

Web Title: Payment of arrears to the power distribution company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.