वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:49 AM2021-09-09T04:49:04+5:302021-09-09T04:49:04+5:30

------------------ दुचाकी चोरीला डोंबिवली : आडीवली गाव परिसरातील अस्मिता पार्क येथे राहणारे प्रदर्शन मळेकर यांनी त्यांची दुचाकी घराजवळ पार्क ...

Pedestrian killed in vehicle collision | वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

Next

------------------

दुचाकी चोरीला

डोंबिवली : आडीवली गाव परिसरातील अस्मिता पार्क येथे राहणारे प्रदर्शन मळेकर यांनी त्यांची दुचाकी घराजवळ पार्क केली होती. तेथून ती गाडी ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान चोरीला गेल्याची घटना घडली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

------------------------------------

ज्वेलर्स फोडून दागिने लंपास

डोंबिवली : ठाकुर्ली पूर्वेतील कचोरे गाव, सर्वादय लीला सोसायटीत राहणारे संतोषकुमार जैन यांचे डोंबिवलीतील गोग्रासवाडीतील तुकाराम भवन येथे रत्नमणी ज्वेलर्स आहे. या दुकानाची मागील भिंत फोडून चोरट्यांनी दुकानातील ६८ हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी टिळकनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

---------------

घरफोडीत ऐवज चोरीला

डोंबिवली : नांदिवली रोडवरील पुष्पलता अपार्टमेंटमध्ये राहणारे हर्षल पाटील हे जानेवारी २०२१पासून पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे परिवारासह राहण्यास गेले होते. डोंबिवलीतील बंद घर फोडून चोरट्यांनी घरातील सोने, चांदीचे दागिने आणि रोकड असा ४ लाख ६० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पाटील यांनी टिळकनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

------------------

कोरोनाचे ५७ नवे रुग्ण

कल्याण : केडीएमसी हद्दीत बुधवारी कोरोनाचे नवे ५७ रुग्ण आढळून आले, तर उपचाराअंती ६६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ६३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मनपा हद्दीत एक लाख ३८ हजार ४१ इतके रुग्ण बरे झाले आहेत.

-------------------------------------------

Web Title: Pedestrian killed in vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.