डोंबिवलीत बेकायदा ३० रिक्षा, १० बस चालकांवर दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 11:16 AM2018-11-21T11:16:49+5:302018-11-21T11:16:57+5:30

बहुतांशी स्टँडवर फोर्थ सीट, बॅज नसणे, लायसन नसणे यासह वय कमी असतानाही बेकायदा रिक्षा चालवण्यात येत असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे.

Penal action on Dombivli 30 rickshaw, 10 bus drivers | डोंबिवलीत बेकायदा ३० रिक्षा, १० बस चालकांवर दंडात्मक कारवाई

डोंबिवलीत बेकायदा ३० रिक्षा, १० बस चालकांवर दंडात्मक कारवाई

Next

डोंबिवली: येथील बहुतांशी स्टँडवर फोर्थ सीट, बॅज नसणे, लायसन नसणे यासह वय कमी असतानाही बेकायदा रिक्षा चालवण्यात येत असून त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. अशा रिक्षा चालकांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरातील रामनगर, इंदिरा गांधी चौकातील काही रिक्षा चालकांनी केली होती. त्यानुसार रामनगर पोलीस, वाहतूक पोलीस नियंत्रक शाखेचे पोलीस, वॉर्डनने बुधवारी सकाळी भगतसिंग, फतेह अली रोडवर धडक कारवाई केली. त्यामध्ये ३० रिक्षा चालक, १० बस चालकांकडून दंड आकारण्यात आला.

लोकमतच्या हॅलो ठाणेमध्ये ‘बेकायदा रिक्षांना घाला लगाम’या आशयाचे वृत्त येताच वाहतूक नियंत्रक, रामनगर पोलिसांनी सकाळी ७.३० वाजल्यापासून सकाळी ९ वाजेपर्यंत ही कारवाई केली. रिक्षा, बस चालकांनी गणवेश न घालणे, लायसन आणि वाहनांचे कागदपत्र न बाळगणे, यासह सर्रासपणे फोर्थ सीट अशी बेकायदा वाहतूक होत असल्याचे पोलिसांच्या नीदर्शनास आले. रामनगरचे पोलिस उपनिरिक्षक मनोहर घाडगे, हवालदार एस.इंगळे, नाना मुळे, रंगनाथ पाटील आदींसह वाहतूक पोलिस नियंत्रक शााखेचे पोलिस आणि वॉर्डन आदींनी संयुक्तपणे कारवाई केली. अशी कारवाई सातत्याने व्हावी, रिक्षा चालकांच्या मुजोरीला आळा घालावा अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली.

सकाळी पहाटेच्या वेळेत आणि मध्यरात्री सर्वात जास्त प्रमाणात बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती रिक्षाचालकांनी यावेळी पोलिसांना दिली. त्यानूसार केवळ याच ठिकाणी नव्हे तर इंदिरा गांधी चौक, शिवमंदिर, चार रस्ता, रामनगर, राजाजी पथ, टंडन रोड, एमआयडीसी आदी सर्व ठिकाणी पोलिसांनी सतत पंधरा दिवस जरी कारवाई केली तरी काही प्रमाणात शिस्त लागु शकते, पण पोलिस त्यात सातत्य ठेवत नसल्याने कारवाई नाममात्रच असल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले. पलावा, रिजन्सी यांसह अन्य खासगी कंपन्यांच्या बस चालकांनी, तसेच स्कूल व्हॅनच्या चालकांनाही दंड ठोठावण्यात आला. वाहनांची कागदपत्र न बाळगणे, लायसन नसणे यासह अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुचाकीस्वारांनाही टिबल सीट वाहन न चालवण्याची तंबी देण्यात आली. काहींना तासभर थांबवण्यात आले होते. त्यानंतर मात्र समज देत सोडण्यात आले. या सर्व कारवाईमध्ये आरटीओ, कल्याणचे पथकाचा देखिल समावेश असता तर वाहनचालकांमध्ये दबदबा निर्माण झाला असता. आरटीओ अधिका-यांनी याची नोंद घ्यावी अशी अपेक्षा पोलिस कर्मचा-यांनी व्यक्त केली. आरटीओचे पथक दिवसभरातून विविध वेळांमध्ये शहरात येत असून कारवाई करते असे चित्र व्हायला हवे. पण आभावानेच आरटीओ येथे येतात, त्यामुळे त्यांचा वचक वाहनचालकांवर रहात नसल्याचेही वाहतूक नियंत्रक पाेिलसांनी सांगितले.

Web Title: Penal action on Dombivli 30 rickshaw, 10 bus drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.