घाण करणाऱ्या २३00 जणांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:24 AM2019-08-08T00:24:55+5:302019-08-08T00:25:13+5:30
ठाणे स्थानकाने अस्वच्छतेचा डाग पुसला; ४.११ लाखांचा दंड वसूल
- पंकज रोडेकर
ठाणे : अस्वच्छ रेल्वेस्थानक म्हणून ठाणेरेल्वेस्थानकाचे ‘टॉप टेन’च्या यादीत नाव आल्यावर ठाण्यावर प्रचंड टीका झाली. त्यानंतर, रेल्वे प्रशासनाने कंबर कसून हा डाग पुसून काढण्यासाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून त्याचा फटका रेल्वेस्थानकात थुंकणे असो, या कचरा करणाºया २३०० जणांना बसला आहे. या कारवाईनंतर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ठाणे रेल्वेस्थानकाने स्वच्छतेत ए श्रेणीत बेस्ट रेल्वेस्थानकाचा असा पुरस्कारही मिळवून हा डाग पुसून काढला आहे.
ऐतिहासिक ठाणे रेल्वेस्थानकात एकूण १० फलाट आहेत. मध्य रेल्वेवर जलद-धीम्या लोकल सेवांसह ट्रान्स-हार्बर, एक्स्प्रेस आणि मालगाड्यांची वाहतूक सातत्याने सुरू असते. दिवसाला सात ते आठ लाख प्रवासी ठाणे रेल्वेस्थानकातून येजा करतात. त्यातच रेल्वेस्थानकातून आत आणि बाहेर जाण्यासाठी २६ गेट आहेत. गुटखा, पानमसाला यासारखे तंबाखुजन्य पदार्थ खाणारे फलाटावर मिळेल त्या जागेत थुंक तात. त्याचबरोबर खाद्यपदार्थ खाऊन झाल्यावर पिशव्या किंवा खाद्यपदार्थ टाकून पळ काढतात. गर्दुल्ले-भिकारी यांच्यामुळे स्थानकात अस्वच्छता पसरल्याने मध्यंतरी रेल्वेस्थानकाचे नाव टॉप टेनच्या यादी झळकले होते. त्यानंतर, रेल्वे प्रशासनाने जानेवारी ते जुलै २०१९ च्या या सात महिन्यांत दोन हजार २६० जणांना अस्वच्छता करताना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात जवळपास एक हजार ८२५ जणांवर करवाई केली आहे. ही कारवाई तिकीट निरीक्षक (टीसी) विभागामार्फत रेल्वेस्थानकात तैनात असलेले २६ ठिकाणी तपासणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जनजागृती मोहीम राबवली
रेल्वेस्थानकातून जातायेता कुठेही न थुंकण्याचे, कचराकुंड्यांचा वापर करण्याचे, तसेच कुठेही कचरा करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. त्याबाबत प्रशासनामार्फत वेळोवेळी जनजागृती मोहीमही राबवण्यात येते. मात्र त्यातूनही उपयोन न झाल्यास कारवाईचा मार्ग पत्करला जातो. कारवाईचा बडगा यापुढेही सातत्याने सुरूच राहणार असल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.