बालाजी डेव्हलपर्सला दंड
By Admin | Published: February 15, 2017 04:42 AM2017-02-15T04:42:25+5:302017-02-15T04:42:25+5:30
खोलीविक्रीचे ग्राहकाकडून आगाऊ पैसे घेऊन त्याला खोलीचा ताबा न देता सदोष सेवा देणाऱ्या बालाजी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सला
ठाणे : खोलीविक्रीचे ग्राहकाकडून आगाऊ पैसे घेऊन त्याला खोलीचा ताबा न देता सदोष सेवा देणाऱ्या बालाजी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सला ग्राहक मंचाने १० हजारांचा दंड सुनावला आहे.
ससंका मैती यांनी बालाजीच्या प्रस्तावित कल्याण येथील चाळीतील एक खोली ३,२५,००० हजारांना घेण्याचे ठरले. सप्टेंबर २०१२ मध्ये मैती यांनी बिल्डरला ११ हजार बुकिंग रक्कम, तर आॅक्टोबरमध्ये १ लाख दिले. फेब्रुवारी २०१३ मध्ये बिल्डरने मैती यांच्या खोलीविक्रीचा करारनामा करून मार्च २०१३ पर्यंत ताबा देण्याचे मान्य केले. काही दिवसांनी मैती उर्वरित रक्कम घेऊन गेले असता साइटवरील आॅफिस बंद होते. अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही. अखेर त्यांनी मंचाकडे तक्रार दाखल केली. त्यांना पाठवलेली नोटीस लेफ्ट शेऱ्यासह परत आली.
कागदपत्रांची मंचाने पडताळणी केल्यावर बिल्डरने रक्कम स्वीकारूनही मैती यांना त्रुटीची सेवा दिली, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)