दंड चुकवणाऱ्यांचे अर्ज होणार बाद!

By admin | Published: February 3, 2017 02:07 AM2017-02-03T02:07:48+5:302017-02-03T02:07:48+5:30

पालिकेची जकात, एलबीटी अथवा जाहिरातीची रक्कम थकवली असल्यास त्या उमेदवारांचा अर्ज बाद केला जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांची धावपळ सुरु झाली आहे.

Penalty defaulters to apply for later! | दंड चुकवणाऱ्यांचे अर्ज होणार बाद!

दंड चुकवणाऱ्यांचे अर्ज होणार बाद!

Next

ठाणे : पालिकेची जकात, एलबीटी अथवा जाहिरातीची रक्कम थकवली असल्यास त्या उमेदवारांचा अर्ज बाद केला जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांची धावपळ सुरु झाली आहे. पूर्वी मालमत्ताकर आणि पाणीपट्टी थकबाकीदारांनाच निवडणूक लढवण्यास मज्जाव केला होता. परंतु, आता यापुढेही जाऊन ज्यांनी जकात चुकवली असेल, एलबीटीचा भरणा केलेला नसेल व अनधिकृत बॅनर, पोस्टर लावून दंडाची रक्कम अद्यापही भरलेली नसेल, अशांवरही उमेदवारी अर्ज बाद होण्याची वेळ आली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. काहींनी मालमत्ता व पाणीपट्टी भरणा केल्यानंतर, त्याचे शपथपत्र मिळवण्यासाठी प्रभाग समितीत अर्ज केले आहेत. मात्र आता त्यांच्यावर पालिकेच्या निवडणूक विभागाकडून आणखी एक तलवार कोसळणार आहे. (प्रतिनिधी)

कोणाचा होणार पत्ता कट?
विशेष म्हणजे, येथील व्यापारीवर्ग प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यांचीच या करांची थकबाकी अधिक असू शकते. तसेच काही राजकीय मंडळींनी वाढदिवसांचे, स्वागताचे बॅनर, पोस्टर लावताना परवानगी घेतली नसेल व दंडाची रक्कम भरली नसेल तर त्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे. उमेदवारी अर्जांची छाननी होण्यापूर्वी थकबाकीदारांची नावे जाहीर होणार आहेत. त्यामुळे यातून कोणाचा पत्ता कट होणार, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Penalty defaulters to apply for later!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.