वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर 22 कोटींची दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 12:28 AM2020-11-21T00:28:21+5:302020-11-21T00:28:28+5:30

दंड न भरल्यास वाहने जप्त होणार : पोलीस उपायुक्तांचा इशारा

Penalty of Rs 22 crore for traffic offenders | वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर 22 कोटींची दंडात्मक कारवाई

वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर 22 कोटींची दंडात्मक कारवाई

Next

n  लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक नियम तोडणारे चालकांविरुद्ध जानेवारी ते १८ नाेव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये २२ कोटी दोन लाख ७५ हजार १५० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. यातील अनेकांनी हा दंड भरलेला नाही. यापुढे थकीत दंड १० दिवसांमध्ये न भरल्यास संबंधित वाहन जप्त केले जाणार असल्याचा इशारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला.


शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या १८ उपविभागांमार्फतीने १४ फेब्रुवारी २०१९ पासून ई-चलन प्रक्रिया सुरू केली आहे. वाहतूक नियम तोडणारे दररोज सुमारे अडीच हजार वाहनचालकांविरुद्ध ३०० ई-चलन डिव्हाइसमार्फत विशेष मोहिमेंतर्गत कारवाई केली जाते. 
रस्ते अपघातांमध्ये घट येण्यासाठी तसेच वाहतुकीमध्ये शिस्त येण्यासाठी चालकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. या कायद्याची परिणामकारकता साधण्यासाठी नियम तोडणारे वाहनचालक आणि मालकांकडून ई-चलनाद्वारे केलेल्या कारवाईची तडजोड रक्कम वसूल होणेही आवश्यक आहे. त्यामुळे एका विशेष मोहिमेंतर्गत यापुढे दंड थकविणारे यांच्याविरुद्ध नाकाबंदीद्वारे वाहनांची चलनतपासणी केली जाणार आहे अशी माहिती या वेळी देण्यात आली.

महाराष्ट्रात कुठेही भरता येणार दंडाची रक्कम
nएखाद्याने ठाण्यात वाहतुकीचा नियम मोडला असेल, तर संबंधित वाहनचालक हा मुंबईत किंवा महाराष्ट्रात कुठेही वाहतूक शाखेच्या पोलिसांकडे ई-चलनाची रक्कम डेबिट किंवा क्रेडिटकार्डद्वारे भरणा करू शकतो.
nमहाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर जाऊनही वाहन क्रमांक, चलन क्रमांक नमूद करून आपल्या वाहनावरील प्रलंबित तडजोड शुल्क चलन क्रमांकाची निवड करून भरता येणार आहे.
nपेटीएमद्वारेही चलन भरण्याची सुविधा आहे. तसेच महाराष्ट्र ॲप, मुम ट्रॅफिक ॲपमध्ये माय व्हेइकल या टॅबवर क्लिक करून आपल्या वाहनाचे रजिस्ट्रेशन करावे. नंतर, माय ई-चलनवर क्लिक केल्यावर ही रक्कम भरता येणार आहे.

थकबाकीदारांवर बडगा 
१४ फेब्रुवारी ते डिसेंबर २०१९ दरम्यान सहा लाख ३० हजार २३२ चलनद्वारे २१ कोटी १४ लाखांची दंडात्मक कारवाई झाली. तर, १ जानेवारी ते १८ नोव्हेंबर २०२० या काळात पाच लाख ५२ हजार ४५३ चलनद्वारे २२ कोटी दोन लाख ७५ हजार १५० रुपयांची दंडात्मक कारवाई झाली. यातील थकबाकीदारांवर आता कारवाई केली जाणार आहे. 

Web Title: Penalty of Rs 22 crore for traffic offenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.