जनतेनेच आता जातीयवादी शक्तींना रोखले पाहिजे : नसीम खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 22:36 IST2021-11-14T22:35:15+5:302021-11-14T22:36:31+5:30

संपूर्ण महाराष्ट्रात १४ ते २९ नोव्हेंबरपर्यंत राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा प्रारंभ पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण नसीम खान यांच्या हस्ते करण्यात आला.

People should stop racist forces now: Naseem Khan | जनतेनेच आता जातीयवादी शक्तींना रोखले पाहिजे : नसीम खान

राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा ठाण्यातून प्रारंभ

ठळक मुद्देराज्यव्यापी जनजागरण अभियानाचा ठाण्यातून प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: केंद्रातील भाजप सरकारने महागाई वाढवून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. देशात जातीयवादी शक्ती सक्रिय झाल्या आहेत. जनतेनेच अशा जातीयवादी शक्तीला रोखले पाहिजे, असे उद्गार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री नसीम खान यांनी रविवारी ठाण्यात केले.
संपूर्ण महाराष्ट्रात १४ ते २९ नोव्हेंबरपर्यंत राज्यव्यापी जनजागरण अभियानाचा प्रारंभ पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण नसीम खान यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण, ज्येष्ठ काँग्रेस नेते सुरेश ठाणेकर, प्रदेश काँग्रेस सचिव अनिस कुरेशी, महेश कांबळे, मोहन तिवारी, सुखदेव घोलप आदी पदाधिकारी उपस्थित होते. संविधान दिनी म्हणजेच २९ नोव्हेंबरपर्यंत हे जनजागरण अभियान विविध भागांत राबविण्यात येणार आहे. या अभियानात प्रामुख्याने वाढती महागाई, वाढती बेरोजगारी बाबत जनतेमध्ये जाऊन जनजागरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: People should stop racist forces now: Naseem Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.