पाणी पळवणाऱ्यांना मिळाले मोकळे रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2016 02:34 AM2016-01-28T02:34:32+5:302016-01-28T02:34:32+5:30

णीकपात धुडकावून लावत उल्हास नदीतून जादा पाणी उचलून कल्याण-डोंबिवलीच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मीरा-भार्इंदर पालिकेवर कारवाई करण्याबाबत लघुपाटबंधारे

The people who got water grabbed freely | पाणी पळवणाऱ्यांना मिळाले मोकळे रान

पाणी पळवणाऱ्यांना मिळाले मोकळे रान

Next

कल्याण : पाणीकपात धुडकावून लावत उल्हास नदीतून जादा पाणी उचलून कल्याण-डोंबिवलीच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या मीरा-भार्इंदर पालिकेवर कारवाई करण्याबाबत लघुपाटबंधारे खात्याने कानांवर हात ठेवले आहेत. कारवाई करणे आमच्या हातात नाही. आम्ही फक्त कपातीचे आणि पाणी कसे-किती वापरावे, याचे प्रमाण-आरक्षण ठरवून दिले आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
उल्हास नदीच्या पात्रातून कल्याण-डोंबिवली महापालिका पाणी उचलते. त्यावर, शुद्धीकरणाची प्रक्रिया करून ते पुरविते. या पालिकेप्रमाणेच बदलापूरजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नदीतून पाणी उचलते. जांभूळ येथे औद्योगिक विकास महामंडळ पाणी उचलते. स्टेम पाणीपुरवठा योजनाही या पात्रातून पाणी उचलते. या विविध पाणीग्राहक संस्थांना नदीच्या पात्रातील आरक्षणाचा कोटा ठरवून दिला आहे. नदीपात्रात बारवी आणि आंध्र धरणातून पाणी सोडले जाते. ही दोन्ही धरणे पूर्ण न भरल्याने नोव्हेंबरपासून ३० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली. मात्र, मीरा-भार्इंदर पालिकेने ही पाणीकपात धुडकावून लावत काही दिवसांपासून जास्तीचे पाणी उचलण्यास सुरुवात केली. परिणामी, कल्याण-डोंबिवलीत ठणठणाट झाला. पाण्याच्या पळवापळवीबाबत कारवाई कोण करणार, ते स्पष्ट नाही. कोणी किती पाणी उचलावे, हे ठरवून देणाऱ्या लघुपाटबंधारे खात्याने जादा पाणी उचलण्याच्या कारवाईशी आपला संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली आहे.

आम्ही विनंती करू शकतो!
मीरा-भार्इंदर ३० टक्के पाणीकपात पाळत नसेल. जास्तीचे पाणी घेत असेल तर त्याविरोधात कारवाई काय करणार, अशी विचारणा लघुपाटबंधारे खात्याचे उपअभियंता हेमंत कुलकर्णी यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले, पाण्याचे नियोजन करण्यासाठी आम्ही ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी एखादी संस्था करीत नसेल, तर त्यांच्याविरोधात कारवाईचा अधिकार आम्हाला नाही. आम्ही केवळ त्यांना कपात लागू करा, अशी विनंती करू शकतो. तशी चर्चा आम्ही मीरा-भार्इंदरशी केली आहे.

थोडी स्थिती सुधारली : जुनेजा
नदीपात्रातील ज्या विहिरीतून पाणी घेतले जाते, त्या विहिरीची पातळी दोन दिवसांपूर्वी ०.८० मीटर इतकी खालावली होती. ही सोमवारची स्थिती. त्यात बुधवारी थोडी सुधारणा झाली. बुधवारी पाण्याची पातळी ७० सेंटिमीटरने वाढल्याचे केडीएमसी अभियंता तरुण जुनेजा यांनी सांगितले.

स्टेम आणि कल्याण-डोंबिवलीच्या
मोहने येथील पाणीउपशाच्या ठिकाणी असलेल्या पंपांमधील अंतर ५० मीटर असल्याने स्टेमच्या दिवसरात्र सुरू असलेल्या उपशाचा फटका केडीएमसीच्या पाणीपुरवठ्याला बसतो. त्यामुळे तेथे पाणीटंचाई जाणवते आहे. त्यामुळे स्टेममार्फत होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी, योग्य नियोजनासाठी किमान एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवणे अपरिहार्य आहे.
- सुनील सोनावणे, जिल्हा लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता

मीरा-भार्इंदर पालिकेने कोणाच्याही तोंडचे पाणी पळविलेले नाही. उलट, आमच्या हक्काचे पाणी मागितले असून ते शासकीय धोरणानुसार स्टेममार्फत वितरीत केले जात आहे.
- अच्युत हांगे,
पालिका आयुक्त

सरकारच्या धोरणानुसारच मीरा-भार्इंदर पालिकेची पाणीकपात शिथिल करण्यात आली आहे. त्याबाबत स्टेमने लघुपाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार केला. पण, त्यानंतरही त्यांनी अद्याप नियोजनासाठी निर्देश दिलेले नाहीत.
- शशिकांत साळुंखे, स्टेमचे महाव्यस्थापक

Web Title: The people who got water grabbed freely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.