शहराच्या विकास कामात अडथळे आणणाऱ्याच्या आरोपांना जनताच उत्तर देईल- सरनाईक 

By धीरज परब | Published: October 10, 2022 08:39 PM2022-10-10T20:39:02+5:302022-10-10T20:39:18+5:30

शहराच्या दृष्टीने मंगळवारचे विविध लोकार्पण व भूमिपूजन हे आनंदाचे प्रसंग आहेत . परंतु माजी आमदार नरेंद्र मेहतांनी चांगल्या कार्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे .

People will answer to the charges of those who obstructed the development work of the city - Sarnaik | शहराच्या विकास कामात अडथळे आणणाऱ्याच्या आरोपांना जनताच उत्तर देईल- सरनाईक 

शहराच्या विकास कामात अडथळे आणणाऱ्याच्या आरोपांना जनताच उत्तर देईल- सरनाईक 

Next

मीरारोड -

शहराच्या दृष्टीने मंगळवारचे विविध लोकार्पण व भूमिपूजन हे आनंदाचे प्रसंग आहेत . परंतु माजी आमदार नरेंद्र मेहतांनी चांगल्या कार्यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला हे दुर्दैवी आहे. त्यांनी कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याची भाषा केली तरी शहराचा विकास हा होणारच. मुळात महापालिकेच्या आरक्षणांचा सर्वात जास्त फायदा ज्यांनी घेतला अश्यांच्या बिनबुडाच्या आरोपांना जनतेने निवडणुकीत उत्तर दिले असल्याचे प्रत्युत्तर आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. 

मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री रामदास आठवले व कपिल पाटील यांच्या उपस्थितीत मीरा भाईंदर मधील पहिल्या नाट्यगृहाचे व स्केटिंग रिंगचे उदघाटन , रुग्णालय व पालिका प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन तसेच नरवीर चिमाजी अप्पा व महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यांचे अनावरण होणार आहे . रविवारी मेहतांनी पत्रकार परिषद घेऊन रुग्णालय व प्रशासकीय भवन भूमिपूजन तसेच महाराणा प्रताप पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमा बाबत गंभीर आरोप व आक्षेप उपस्थित केले होते. 

तर सोमवारी सरनाईक यांनी आमदार गीता जैन, भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास , शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजू भोईर व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांच्या सह मिळून पत्रकार परिषद घेतली. यावेळी मेहतांना भरपूर ज्ञान असल्याने मी देखील त्यांचा सल्ला घेत असतो असा चिमटा काढत मेहतांनी केलेल्या आरोपांना खोडून काढले.  

महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे दोन वर्षा पूर्वी परवानगी नसताना बेकायदा अनावरण केले होते व त्यात स्वतःच्या नावाची पाटी लावून राजकीय स्वार्थ साधण्याचा खटाटोप केला गेला. महाराणा यांच्या पुतळ्याचे अधिकृतपणे व सन्मानाने लोकार्पण व्हावे अशी लोकांची इच्छा होती असे सरनाईक म्हणाले. 

कनकिया येथील रुग्णालयाच्या आरक्षणात शासनाच्या नवीन नियमां प्रमाणे विकासका कडून टीडीआरच्या मोबदल्यात रुग्णालय इमारत बांधून घेतली जाणार असून ती सव्वा तीन लाख फुटांची असेल व शासन त्यात मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरु करेल. जेपी इन्फ्रा - वेस्टर्न हॉटेल जवळ महापालिका प्रशासकीय भवन इमारत सुद्धा सुविधा भूखंडात विकासका कडून बांधून घेतली जाणार आहे.  वास्तविक अश्या चांगल्या कार्यासाठी दोन्ही आमदारांनी मनाचा मोठेपणा दाखवत माजी सर्व खासदार - आमदार, महापौरांची नावे निमंत्रण पत्रिकेत टाकायला लावली.  

परंतु महापालिका , स्थायी समिती आदी सर्व बंद झाल्याने काहींची तडफड सुरु आहे . प्रशासकीय भवनेचे भूमिपूजन होत असलेल्या भागात कोणी जागा खरेदी चालवली आहे ?  आधी स्वतः पाणथळ असल्याचा प्रस्ताव आणला व नंतर त्याच जागी एसके स्टोन जवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालिका प्रशासकीय भवनचे भूमिपूजन करायला लावले . ती जागा सरकारी व वादग्रस्त निघाल्याने ते काम रखडले. 

 टेक्निकल शाळेचे एकमेव आरक्षण असताना त्यात स्वतःची खाजगी शाळा सुरु केली , रुग्णालयाच्या आरक्षणात स्वतःचे रुग्णालय सुरु करून पक्ष कार्यालय थाटले , न्यू गोल्डन नेस्ट जवळ उद्यानाच्या आरक्षणात इमारत बांधण्याचा लाभ स्वतःसाठी घेतला. तेच लोक महापालिकेला जनतेच्या सुविधेसाठी करोडो रुपयांच्या वास्तू विकासकां कडून बांधून मिळत असल्याचे पाहून पोटदुखी होणे चांगले नाही. 

नाट्यगृह होऊ नये , तरण  तलाव होऊ नये म्हणून  अश्या काही मंडळींनी अडथळे आणण्याचा आटापिटा केला पण आपण शासना कडून मंजुऱ्या आणून हि कामे पूर्ण करून दाखवली व आज ती लोकांसाठी उपलब्ध होत आहेत असे सरनाईक म्हणाले.  

Web Title: People will answer to the charges of those who obstructed the development work of the city - Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.