ठाण्यात पेप्सी आणि वेफर्सच्या गोदामाला आग; मालासह १३ वाहने जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 01:38 PM2021-02-19T13:38:27+5:302021-02-19T13:40:02+5:30
Pepsi and Wafers warehouse caught fire : राजेंद्र खानविलकर यांच्या मालकीच्या या सहा हजार २०० चौ.फुटाच्या गोदामात पेप्सी आणि वेफर्स डिलिव्हरीसाठी भरलेली १३ वाहनेे उभी केली होती. गोडावूनमधील मालासह ती वाहनेही या आगीचे शिकार झाले आहेत.
ठाणे: येथील कोठारी कंपाऊंड येथे पेप्सी आणि वेफर्स कारखान्याच्या गोदामाला शुक्रवारी पहाटे २.२० वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीमध्ये लाखोंच्या मालाचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजेंद्र खानविलकर यांच्या मालकीच्या या सहा हजार २०० चौ.फुटाच्या गोदामात पेप्सी आणि वेफर्स डिलिव्हरीसाठी भरलेली १३ वाहनेे उभी केली होती. गोडावूनमधील मालासह ती वाहनेही या आगीचे शिकार झाले आहेत. गोडावूनमध्ये ये- जा करण्यासाठी एक दरवाजा आहे. त्यातच ते बांधकाम ही जुने असल्याने गोडावूनमध्ये शिरण्यासाठी जेसीबीच्या मदतीने मागील बाजूची भिंत फोडून आता प्रवेश केला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी १ फायर वाहन, २ जंबो वॉटर टँकर, २ लहान वॉटर टँकर,१ रेस्क्यू वाहन आणि एक जेसीबी पाचारण केले होते. चार तासांनी आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आटोक्यात आली. शुक्रवारी सकाळी पूर्ण आगीवर नियंत्रण मिळविण्यात ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाला यश आले. या आगीत १२ वाहनांमध्ये ५ टाटा टेम्पो, १ तीनचाकी टेम्पो, २ टाटा इंट्रा, ३ टाटा ४०७ टेम्पो आणि १ मारुती कॅरी तसेच १ दुचाकीचा ही त्यामध्ये समावेश आहे. तर , ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी वर्तवली आहे.