जिल्ह्यात कोरोनाशी दोन हात करणाऱ्यांची टक्केवारी पुन्हा लागली वाढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:38 AM2021-05-01T04:38:15+5:302021-05-01T04:38:15+5:30
ठाणे : कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९० ते ९४ टक्क्यांच्या घरात होती. मात्र ...
ठाणे : कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९० ते ९४ टक्क्यांच्या घरात होती. मात्र त्सुनामीसारख्या आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आणि कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत घट झाली होती. परंतु आता कोरोनाशी दोन हात करून त्याला हरवून घरी परतणाऱ्यांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत असून, अशांची टक्केवारी ८९.०४ इतकी आहे. म्हणजे आतापर्यंत ४ लाख १३ हजार २५२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील ३ लाख ५८ हजार ६२३ जण असून, नगरपालिका हद्दीतील ३१ हजार ९०३, तर ग्रामीण भागातील २२ हजार ७२६ नागरिकांचा समावेश आहे. ही जिल्ह्यासाठी आनंददायक बाब आहे ठाणे जिल्हा हा शहरी आणि ग्रामीण असा विभागाला गेला आहे. तसेच जिल्ह्यातील सहा महापालिका, दोन नगरपालिका आणि ग्रामीण भागाचा विचार केल्यास महापालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत ३ लाख ५८ हजार ६२३ जण कोरोनामुक्त झाले आहे. नगरपालिका हद्दीत ३१ हजार ९०३, तर ग्रामीण भागातील २२ हजार ७२६ नागरिक मात करत घरी परतले आहे. एकूण जरी टक्केवारी ही ८९.०४ वर पोहोचली असली तरी सहा महापालिकांची एकूण टक्केवारी ८९.२७ इतकी आहे. दोन नगरपालिकांमधील ८८.६६, तर ग्रामीण भागाची टक्केवारी ८६.०४ इतकी असल्याची माहिती शासकीय आकडेवारी दिसत आहे. आतापर्यंत ठाणे महापालिका हद्दीत १ लाख ५ हजार ९५० जणांनी कोरोना हरवले असून, ती टक्केवारी ८९.६१ इतकी आहे. नवी मुंबईत ८३ हजार ६७२ जण बरे झाले असून, तेथील टक्केवारी ९०.९७ टक्के इतकी आहे. केडीएमसीत १ लाख ५ हजार ७५० सुखरूप घरी परतले असून, तेथील टक्केवारी ८८.१९ इतकी आहे. मीरा भाईंदर ३७ हजार ६५६ (८७.१३), भिवंडीत ०८ हजार ९०० (९०.६७), उल्हासनगर १६ हजार ६९३ (८९.१४), अंबरनाथ १५ हजार २२६ (८६.२७), कुळगाव बदलापूर १६ हजार ६७७ (९०.७२), तर ग्रामीण भागात २२ हजार ७२६ जणांनी कोरोनाला पळवून लावल्याचे आकडेवारी दिसत आहे.
.............
वाचली