कोरोना काळातील ठाणे पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद: एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 01:00 AM2020-12-17T01:00:27+5:302020-12-17T01:04:56+5:30

गुन्हेगारीवर नियंत्रणाबरोबरच ठाणे पोलिसांनी कोरोनाच्या संकटकाळात ठाणेकरांना मदतीचा हात दिला. आता रक्तदान करुन माणूसकीचे दर्शनही घडविले, असे गौरवोद्वगार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पोलिसांच्या रक्तदान शिबिरामध्ये बुधवारी काढले.

Performance of Thane Police during Corona period is commendable: Eknath Shinde | कोरोना काळातील ठाणे पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद: एकनाथ शिंदे

ठाण्यातील ५०० पोलिसांचा रक्तदानाचा संकल्प

Next
ठळक मुद्दे ठाण्यातील ५०० पोलिसांचा रक्तदानाचा संकल्प राज्यातील रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: परप्रांतीयांना दिली जाणारी मदत असो की, अन्नधान्याचे वाटप असो गुन्हेगारीवर नियंत्रणाबरोबरच ठाणेपोलिसांनी कोरोनाच्या संकटकाळात ठाणेकरांना मदतीचा हात दिला. आता रक्तदान करुन माणूसकीचे दर्शनही घडविले, असे गौरवोद्वगार ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पोलिसांच्या रक्तदान शिबिरामध्ये बुधवारी काढले.
येथील सिद्धी हॉल सभागृहामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलिसांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी या शिबिरामध्ये औपचारिकरित्या मार्गदर्शन करतांना पालकमंत्री शिंदे यांनी हे गौरवोद्गार काढले. यावेळी त्यांच्यासमवेत ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार, मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणे पोलिसांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या प्रारंभानंतर काही काळातच तब्बल १५० पोलिसांनी रक्तदान केले. सुमारे ५०० पोलीस रक्तदान करून हा तुटवडा संपुष्टात आणण्याचा निर्धार ठाणे पोलिसांनी केला आहे.
राज्यात रक्ताचा तुटवडा असल्याने मुख्यमंत्र्यानी आवाहन केल्यानंतर अशा प्रकारे राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला, ही बाबही कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. राज्यभरात रक्ताचा तुटवडा असताना विविध पक्ष, नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिरे सुरु आहेत. त्यात ठाणे पोलिसांनीही आपला खारीचा वाटा देत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे, ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी, ठाणे नगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी, मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसह महिला कर्मचाऱ्यांनीही या रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदविला. पोलीस आयुक्त फणसळकर यांनीही रक्तदान करणाºया आपल्या कर्मचाºयांची आस्थेने विचारपूस करुन त्यांच्या दातृत्वाचे कौतुक केले.

Web Title: Performance of Thane Police during Corona period is commendable: Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.