डोंबिबलीत कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्र, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 10:02 AM2018-01-24T10:02:52+5:302018-01-24T10:05:06+5:30

नागरिकांच्या सूचनांची दखल घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवार, 24 जानेवारीपासून कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्राची सुविधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

permanent adhar card section in Dombivali | डोंबिबलीत कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्र, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

डोंबिबलीत कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्र, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Next

डोंबिवली- नागरिकांच्या सूचनांची दखल घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवार, 24 जानेवारीपासून कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्राची सुविधा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची उपविभागीय इमारत, डोंबिवली पूर्व येथे ते कायमस्वरूपी केंद्र असेल असेही राज्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. याआधी गेल्या आठवड्यात भाजपचे पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रज्ञेश प्रभुघाटे यांनी तीन दिवसीय शिबिर आयोजित केले होते, त्याला सुमारे 700 नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यापाठोपाठ स्वीकृत नगरसेवक राजन सामंत यांनीही तातडीने 21 जानेवारी रोजी बालभवन येथे हा उपक्रम राबवले, त्यानुसार नागरिकांनी चव्हाण यांच्याकडे आधारकार्ड ची कायम स्वरूपी सोया व्हावी अशी मागणी केली, त्यांनीही तातडीने यंत्रणा कार्यान्वित करत बुधवारपासून ही सुविधा मिळेल असे स्पष्ट केले. त्याचा शुभारंभ  सकाळी 9 वाजता राज्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी स्थायी समितीचे सभपती राहुल दामले, भाजपचे नगरसेवक संदीप पुराणिक, राजन अभाळे, नितीन पाटील, विशु पेडणेकर, मंदार टावरे, राजन सामंत विश्वद्विप पवार, शशिकांत कांबळे, संजीव बिडवडकर, रवी ठक्कर, सुरेश पुराणिक, मनीषा धात्रक, खुशबू चौधरी, कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरीक, केडीएमसीचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यमंत्र्यांचे डोबिवलीकर नागरिकांनी विशेष आभार मानत मध्यवर्ती ठीकाणी अत्यन्त अल्पावधीत ही सुविधा दिल्याने समाधान व्यक्त केले, तर आमदार नागरिकांसाठी असून कामासाठी सदैव हजर असे  सांगत चव्हाण यांनीही नागरिकांनी कधीही यावे सूचना द्याव्यात असे आवाहन केले. त्याठिकाणी 6 केंद्राची व्यवस्था असेल असेही स्पष्ट केले.
सध्या शाळा, महाविद्यालये, बँक, यासह सर्वच शासकीय निमसरकारी ठिकाणी आधारकार्ड सक्तीचे आहे, या सुविधेचा नागरिकांना निश्चितच लाभ होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

Web Title: permanent adhar card section in Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.