‘काटई येथील टोलनाका कायमस्वरूपी बंद करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:46 AM2021-09-23T04:46:58+5:302021-09-23T04:46:58+5:30
कल्याण : कल्याण-शीळ रोडवरील काटई टोलनाका कायमस्वरूपी बंद करा, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली असून याबाबतचे ...
कल्याण : कल्याण-शीळ रोडवरील काटई टोलनाका कायमस्वरूपी बंद करा, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली असून याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांना दिले आहे.
कल्याण-शीळ रस्ता हा ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्यावर मौजे काटई येथे टोल आकारणी सुरू होती. परंतु, सध्या एमएसआरडीसीकडून या २१ कि.मी. रस्त्याचे सहा पदरीकरणाचे काम सुरू असून, त्यासाठी १९८ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. रस्त्याचे काम सुरू असल्याने टोल आकारणी बंद केलेली आहे. मात्र, या १९८ कोटी रुपयांच्या रस्त्यासाठी प्रवाशांना भविष्यात टोलचा भुर्दंड लावणे योग्य नाही. यामुळे कल्याण-शीळ रस्त्यासाठी मंजूर असलेल्या निधीची शासनाकडून पूर्तता करून कायमस्वरूपी हा टोल बंद करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
-------------