लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांना निवडणुक आयोगाने नाकारली परवानगी

By admin | Published: January 6, 2017 07:00 PM2017-01-06T19:00:05+5:302017-01-06T19:00:05+5:30

विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत अर्धवट स्वरूपात असलेल्या विकासकांमाच्या उद्घाटनाचा धडाका लावणाऱ्या

Permission denied by Election Commission for publicity and earthquake events | लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांना निवडणुक आयोगाने नाकारली परवानगी

लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमांना निवडणुक आयोगाने नाकारली परवानगी

Next

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. 6 - विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी महापालिकेच्या मागील सार्वत्रिक निवडणुकीत अर्धवट स्वरूपात असलेल्या विकासकांमाच्या उद्घाटनाचा धडाका लावणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने यंदाच्या निवडणुकीपूर्वीदेखील अर्धवट स्वरूपात असलेल्या काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि सुरू झालेल्या कामांचे भूमिपूजन  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा घाट घातला होता. परंतु कोकण शिक्षण मतदारसंघाची निवडणुकीच्या  लागलेल्या आचारसंहितेच्या मुद्यावरून भारतीय निवडणूक आयोगाने या कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या अर्धवट अवस्थेत असलेल्या कामांचा लोकार्पण सोहळा करण्याचा घाट घालणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला चांगलीच चपराक बसली आहे. 

 

Web Title: Permission denied by Election Commission for publicity and earthquake events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.