कल्याण-डोंबिवलीत खुल्या जागेवर व पटांगणांवर फटाके विक्रीची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2017 05:44 PM2017-10-07T17:44:30+5:302017-10-07T17:44:45+5:30

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किरकोळ फटाके विक्रीच्या दुकानांची परवानगी खुल्या जागेवर व पटांगणावर दिली जाईल असे कल्याण डोंबिवली महापालिकेने जाहिर केले आहे.

Permission for sale of firecrackers in open-air and courts at Kalyan-Dombivli | कल्याण-डोंबिवलीत खुल्या जागेवर व पटांगणांवर फटाके विक्रीची परवानगी

कल्याण-डोंबिवलीत खुल्या जागेवर व पटांगणांवर फटाके विक्रीची परवानगी

Next

कल्याण - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किरकोळ फटाके विक्रीच्या दुकानांची परवानगी खुल्या जागेवर व पटांगणावर दिली जाईल असे कल्याण डोंबिवली महापालिकेने जाहिर केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करायचा आहे. मात्र महापालिकेने हा निर्णय फटाके विक्रेत्यांना आधी कळविला असता तर त्यांची गडबड झाली नसती अशी भूमिका डोंबिवलीच्या फटाके विक्रेत्यानी घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी आज महापौर राजेंद्र देवळेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर आयुक्तांशी बोलून काय करता येते का असे आश्वासन महापौरांनी फटाके विक्रेत्यांना दिले आहे.

फटाके विक्रेत्यांच्या सोबत धनंजय चाळके यांनी महापौरांची भेट घेतली. चाळके यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाचा आम्हाला आदर करायचा आहे. मात्र हा निर्णय महापालिकेने उच्च न्यायालयाचा आधार देत आम्हाला सांगितला आहे. प्रत्यक्षात त्याची पूर्व कल्पना एक महिना आधी विक्रेत्यांना देणो आवश्यक होते. डोंबिवलीत फटाके विक्रते आहे. त्यांनी फटाके विक्रीची परवानगी काढली आहे. त्यांनी फटाके विक्रीचा माल आणला आहे. त्याचे बुकिंग आधीच केले आहे. हे फटाके विक्रेते केळकर रोड, फडके रोड आणि मानपाडा रोडवर किरकोळ फटाके विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांना ऐनवेळी न्यायालयाच्या आदेशाचा आधार देत डोंबिवली क्रीडा संकुलात पाठविले जाणार आहे. स्टेशन परिसर सोडला तर फटाके घेण्यासाठी ग्राहक क्रीडा संकुलात येणार नाहीत. त्यामुळे फटाके विक्रेत्यांचा धंदाच होणार नाही. डोंबिवली क्रीडा संकुलातही मोकळ्य़ा मैदानाची जागा दिली जात नाही. तर मैदाना भोवतालचा परिसर दिला जाणार आहे.

क्रीडा संकुलातही कार्यक्रम
या विषयाकडे फटाके विक्रेत्यांनी महापौरांचे लक्ष वेधले आहे. किमान आधी पूर्व कल्पना दिली असती तर फटाके विक्रेत्यांना त्याची तयारी करता आली असता. यावर महापौर देवळेकर यांनी या संदर्भात आयुक्तांशी चर्चा करुन सांगतो  असे आश्वासन दिले आहे. 

एक खिडकी योजना
महापालिकेने मोकळ्य़ा व पटांगणात फटाके विक्रीसाठी परवानगी देण्याकरीता 9 ते 13 ऑक्टोबर या काळावधीत एक खिडकी योजना जाहिर केली आहे. कल्याणमध्ये ब प्रभागात ही एक खिडकी सुरु राहिल. तर डोंबिवलीत महापालिकेच्या विभागीय कार्यालयात एक खिडकी सुरु केली आहे. प्रथम अर्ज करुन मागणी करणा:या जागा वाटपात प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. टिटवाळ्य़ात नौका विहार जवळील मोकळी जागा, रिजेन्सी सर्वम, कल्याण पश्चिमेत यशवंतराव चव्हाण मैदान, आधारवाडी जेल, फडके मैदान, कल्याण प्श्चिमेत दादासाहेब गायकवाड प्रांगण, विठ्ठलवाडी पोलिस स्टेशन जवळ, डोंबिवली पूव्रेत क्रिडा संकुल, डोंबिवली पश्चीमेत भागशाळा मैदान या ठिकाणीच परवानगी दिली जाणार आहे. 

कारवाई अटळ
निवासी इमारती, व्यापारी इमारती व नागरी वस्तीत फटाके विक्रीस परवानगी दिली जाणार नाही. त्याचबरोबर मोकळ्य़ा जागा व पटांगणां व्यतिरिक्त इतर कोणत्याही अथवा हातगाडीवर फटाके विकताना आढळून आल्यास त्याच्या विरोधात पोलिस व महापालिका अधिकारी संयुक्त कारवाई करतील असा सज्जड इशारा पालिकेने दिला आहे. 

Web Title: Permission for sale of firecrackers in open-air and courts at Kalyan-Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.