घरासाठी पैसे आणावेत म्हणून छळ

By admin | Published: April 18, 2016 12:41 AM2016-04-18T00:41:27+5:302016-04-18T00:41:27+5:30

घरासाठी पैसे आणावेत, यासाठी कळव्यातील एका विवाहितेला रॉडने मारहाण करून घरात डांबून ठेवल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी

Persecution to bring home money | घरासाठी पैसे आणावेत म्हणून छळ

घरासाठी पैसे आणावेत म्हणून छळ

Next

ठाणे : घरासाठी पैसे आणावेत, यासाठी कळव्यातील एका विवाहितेला रॉडने मारहाण करून घरात डांबून ठेवल्याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोपट सावंत (सासरे), शांताबाई (सासू), बाबासाहेब (पती) आणि सुनीता खंडागळे (नणंद) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कथित आरोपींची नावे आहेत. सम्राटनगर, हिरादेवी चाळीत राहणाऱ्या प्रिया सावंत (२२) हिचा ८ जून २०१३ ते १६ एप्रिल २०१६ या तीन वर्षांच्या काळात हुंड्यासाठी छळ सुरू असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करून तिला मारहाणही केली जात होती. तिने जाऊन तक्रार करू नये म्हणून तिला घरातच डांबूनही ठेवले.

Web Title: Persecution to bring home money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.