माझा फोन का कट केला?, म्हणत दिराची भाऊजईला बेदम मारहाण
By नितीन पंडित | Published: October 19, 2023 04:01 PM2023-10-19T16:01:58+5:302023-10-19T16:02:01+5:30
अमोल माणिक होळकर वय ३२ वर्ष रा.शिवाजी नगर कामतघर असे भावजईला मारहाण करणाऱ्या आरोपी दिराचे नाव आहे.
भिवंडी : फोन कट केल्याच्या रागातून दिराने आपल्या भावजईला बेदम मारहाण केल्याची खळबळ जनक घटना भिवंडीतील कामतघर परिसरात बुधवारी घडली आहे. याप्रकरणी भावजईने दिलेल्या तक्रारीवरून दिरा विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल माणिक होळकर वय ३२ वर्ष रा.शिवाजी नगर कामतघर असे भावजईला मारहाण करणाऱ्या आरोपी दिराचे नाव आहे.त्याने आपल्या ३० वर्षीय भावजईने फोन फोन कट केल्याच्या रागातून भावजई घरा बाहेर कपडे धुवत असतांना फोन कट केल्याच्या रागाने भावजईला माझा फोन का कट केला? असे म्हणत भाऊजाईला शिवीगाळ करत कपडे धुण्याच्या धुपटन्याने भावजईला बेदम मारहाण करून पुन्हा मारहाण करण्याची धमकी दिली. याप्रकरणी भावजईने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत दिरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.