भिवंडीतील उड्डाणपुलांसह पेट्रोलपंप सामान्य नागरिकांसाठी 14 एप्रिल पर्यंत राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 06:21 PM2020-04-01T18:21:44+5:302020-04-01T18:21:49+5:30
तीन दिवसांपासून या हुलदबाजांवर कारवाई करण्याचे आदेश भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिले होते.
भिवंडी : जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले असून देशासह राज्यातही कोरोनाबाधीत रुग्णांनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर उपाय योजना म्हणून संपूर्ण देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र तरीही काही हुल्लडबाज तरुण दुचाकी व चारचाकी वाहनांमधून शहरातील रस्त्यांवर हुल्लडबाजी करतांना दिसत आहेत.
तीन दिवसांपासून या हुलदबाजांवर कारवाई करण्याचे आदेश भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिले होते. त्यांच्या आदेशानंतर हुल्लडबाज तारूंणावर कारवाई करत दंडुके व उठाबाशांची शिक्षा देखील अशा तरुणांना पोलोसांनी केली , मात्र तरी देखील काही तरुण आजही संचारबंदी कायद्याचा उल्लंघन करीत असल्याचे चित्र समोर येत असल्याने आता भिवंडी पोलिसांनाही हुल्लडबाजांवर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. मात्र हि नाकाबंदी बऱ्याच ठिकाणी शहरातील उड्डाणपुलांच्या खाली असल्याने काही हुल्लडबाज उड्डाणपुलांवरून पोलीसांना चकवा देऊन जात असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात आल्या नंतर आता भिवंडीतील सर्व उड्डाणपूल 14 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी घेतला आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवा देणारी वाहने वगळता शहरातील सर्व पेट्रोल पंप देखील सामान्य नागरिकांसाठी 14 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्या आली आहे. तर पत्रकारांनी आपले ओळखपत्र पेट्रोल पंपवर दाखविल्यास पत्रकारांच्या वाहनांना पेट्रोल मिळणार असल्याचे स्पष्टीकरण देखील पोलीस उपायुक्त शिंदे यांनी केले आहे.
भिवंडी पोलीसांच्या य निर्णयामुळे संचार बंदी कायद्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होणार असून हुल्लडबाजांचा देखील अटकाव होणार आहे त्यामुळे पोलोसांच्या या निर्णयाचे शहरातील सुज्ञ नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.