मीरारोड मध्ये पाणी युक्त पेट्रोल; वाहन बंद पडल्यांने ग्राहक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 10:25 PM2018-07-05T22:25:50+5:302018-07-05T22:26:13+5:30
मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून गेलेल्या ग्राहकांच्या गाड्या बंद पडू लागल्या. पेट्रोल सोबत पाणी मिसळले गेल्याने हा प्रकार झाल्याचे समजताच संतप्त लोकांनी पेट्रोलपंपवर गर्दी केली .
मीरारोड - मीरारोडच्या जुन्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून गेलेल्या ग्राहकांच्या गाड्या बंद पडू लागल्या. पेट्रोल सोबत पाणी मिसळले गेल्याने हा प्रकार झाल्याचे समजताच संतप्त लोकांनी पेट्रोलपंपवर गर्दी केली .
मीरारोडला भारत पेट्रोलियम चा पेट्रोल पंप आहे . साई सर्व्हिस हे या पंपाचे चालक आहेत . दुपारी लोकांनी नेहमी प्रमाणेच या पंपा वर पेट्रोल भरले असता पुढे जाऊन गाड्या बंद पडू लागल्या . गाडी बंद का पडली हे मॅकेनिकला दाखवले असता पेट्रोलच्या टाकीत पाणी असल्याचे उघडकीस आले .
मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आणि पेट्रोल पंपा वर संतप्त जमाव जमला . पंपा वरील कर्मचाऱ्यांशी त्यांची हुज्जत सुरु झाली . नया नगर पोलिसांना याची माहिती मिळाली असता त्यांनी पेट्रोल पंपा वर धाव घेऊन तणाव आटोक्यात आणला . तर पेट्रोल भरण्यासाठी पंप बंद करण्यात आला .
शिधावाटप विभागाचे उपनियंत्रक रोहिणीकर, मीरा भाईंदरचे शिधावाटप अधिकारी सिद्धार्थ कदम तसेच भारत पेट्रोलियमचे अधिकारी उशिरा आल्या नंतर त्यांनी चौकशी सुरु केली . रात्री पर्यंत त्यांची पडताळणी सुरु होती . सतत पाऊस पडत असून व्यवस्थापनाच्या दुर्लक्षा मुळे पेट्रोलच्या टाकीत पाणी गेले असावे . व त्या मुळे इंधन सोबत पाणी देखील वाहनांच्या टाक्यां मध्ये भरले जाऊन लोकांच्या गाड्या बंद पडल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली .