पी.एफ. च्या १.८८ कोटींचा अपहार
By admin | Published: April 20, 2016 01:53 AM2016-04-20T01:53:05+5:302016-04-20T01:53:05+5:30
तारापूर एमआयडीसीमधील बॉॅॅम्बे रेयॉन फॅशन्स लि. या नामवंत कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची कपात केलेली रक्कम निधीच्या खात्यामध्ये जमा
पंकज राऊत, बोईसर
तारापूर एमआयडीसीमधील बॉॅॅम्बे रेयॉन फॅशन्स लि. या नामवंत कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीची कपात केलेली रक्कम निधीच्या खात्यामध्ये जमा न केल्याने बोईसर पोलीस स्थानकात निधीच्या निरीक्षकांनी बॉम्बे रेयॉनच्या तीन संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आता बोईसर पोलीस काय व कधी संबंधितांवर कारवाई करतात याकडे तारापूर औद्योगिक क्षेत्रातील हजारो कामगारांचे लक्ष लागले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्र. सी. ६ व ७ मधील बॉम्बे रेयॉन फॅशन लि. या कारखान्यात उच्च प्रतीच्या कापडाचेमोठ्या प्रमाणात उत्पादन केले जात असून या कारखान्यातील सुमारे १४०३ कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून आॅक्टोबर २०१४ ते डिसेंबर २०१५ अशा पंधरा महिन्यात एक कोटी ८८ लाख, ८६ हजार २८ रू.एवढी भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात करण्यात आली होती.
परंतु तिचा भरणा स्टेट बँकेतील निधी खाते क्र. १ मध्ये न करता तिचा अपहार संगनमत करून स्वत:च्या फायद्याकरीता केल्याचा आरोप निधीचे निरीक्षक गणेश घायवट यांनी बोईसर पोलसांकडे दिलेल्या फिर्यादीमध्ये केला आहे.
या संदर्भात घायवट यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. या संदर्भात बॉम्बे, रेयॉनच्या स्थानिक व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी नो कॉमेन्टस एवढीच प्रतिक्रीया दिली