पीएफ अपहारप्रकरणी तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 04:30 AM2018-09-29T04:30:17+5:302018-09-29T04:30:26+5:30

कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) अपहार केल्याच्या आरोपाखाली पूर्वेकडील एव्हरेस्ट शॉपिंग सेंटरमधील एम. व्ही. वाघाडकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्सचे संचालक सुधीर वाघाडकर, अनिल वाघाडकर, प्रफुल्ल वाघाडकर यांच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 PF case: Three offenders | पीएफ अपहारप्रकरणी तिघांवर गुन्हा

पीएफ अपहारप्रकरणी तिघांवर गुन्हा

Next

डोंबिवली - कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) अपहार केल्याच्या आरोपाखाली पूर्वेकडील एव्हरेस्ट शॉपिंग सेंटरमधील एम. व्ही. वाघाडकर अ‍ॅण्ड सन्स ज्वेलर्सचे संचालक सुधीर वाघाडकर, अनिल वाघाडकर, प्रफुल्ल वाघाडकर यांच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वाघाडकर यांनी दुकानातील १६ कर्मचाºयांच्या पगारातून जानेवारी २०१८ ते आॅगस्ट २०१८ दरम्यानच्या कालावधीत पीएफच्या रकमेचा हिस्सा म्हणून एकूण एक लाख ६६ हजार ५५१ रु पये कापले. मात्र, ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे न भरता ही रक्कम पुन्हा व्यवसायासाठी वापरून अपहार केला, असा त्यांच्यावर आरोप आहे.
याप्रकरणी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अरुण दयाळ यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी अनिल वाघाडकर यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता, ५ आॅक्टोबरपर्यंत कागदपत्रे देण्यासंदर्भात भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची आॅर्डर आपल्याला मिळाली असून पीएफची रक्कम दिल्याचे त्यांनी सांगितले.
काही कंपन्या व व्यापारी कर्मचाºयांचे पीएफचे पैसे कापतात. पण भरत नाहीत. त्याच्यावर पोलिसांनी कारवाईचा आसूड उगारण्याचे ठरवले आहे.

Web Title:  PF case: Three offenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.