पी.एफ.च्या नव्या योजना रोजगारपुरक
By admin | Published: July 2, 2017 05:30 AM2017-07-02T05:30:48+5:302017-07-02T05:30:48+5:30
: नवीन रोजगाराला प्रोत्साहन व प्राधान्य देण्यासाठी भारत सरकारने भविष्य निर्वाह निधीच्या अनेक योजना हाती घेतल्या असून या योजनांची
पंकज राऊत/लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : नवीन रोजगाराला प्रोत्साहन व प्राधान्य देण्यासाठी भारत सरकारने भविष्य निर्वाह निधीच्या अनेक योजना हाती घेतल्या असून या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून बेरोजगारी दूर करण्याकरीता उद्योजकानी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत असे आवाहन भविष्य निर्वाह निधिचे सहाय्यक आयुक्त - मनोज कोळी यांनी तारापूर येथे केले.
एमआयडीसीमधील टीमा सभागृहात पीएफच्या नवीन योजनांची विस्तृत माहिती देण्यासाठी उद्योजक आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्याकरीता आयोजित केलेल्या कार्यशाळेस प्रवर्तन अधिकारी गणेश घायवत उपस्थित होते.
या वेळी प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन व परिधान प्रोत्साहन या दोन योजनांची विस्तृत माहिती देताना त्यांनी सांगितले, की पहिली योजना ही १ एप्रिल २०१६ पासून कारखानदारांनी कामावर नियुक्त केलेल्या नवीन कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे उद्योजकांचे अंशदान (कॉन्ट्रीब्युशन) हे सरकार भरेल, याचा उद्देश हाच आहे की बेरोजगारांना रोजगार प्राप्त करून देणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे. यामुळे बेरोजगारांना जास्तीत जास्त रोजगार प्राप्त होतील आणि जे उद्योजक पी एफ भरण्याकरीता टाळाटाळ करीत होते तसे या पुढे होणार नाही असे त्यांनी सांगितले. तर सरकारने घोषित केलेल्या योजनेमुळे जास्तीत जास्त रोजगार निर्माण होतील. सर्व कामगारांना भविष्य निधीच्या सामाजिक सुरक्षिततेचा व विमा, पेन्शनचा फायदा सर्वाना मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
अशी आहे, पी.एफ.शी निगडित गृहयोजना
ज्या कंपनीमध्ये हे कर्मचारी काम करतात त्यां पैकी किमान दहा कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन एक सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करावी व त्या संस्थेअंतर्गत बिल्डर, डेव्हलपरकडे तिचा प्रस्ताव सादर करावा तो प्रस्ताव भविष्य निधी कार्यालयात जमा करावा.
च्त्या कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये किमान वीस हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा असली पाहिजे तसेच मागील कॉन्ट्रीब्युशनची तपासणी केल्यानंतर प्रस्ताव मंजूर होईल व त्याला देण्यात आलेल्या गृह कर्जाचा हप्ता सरळ त्याच्या कॉन्ट्रीब्युशनमधून संबंधित बिल्डर किंवा डेव्हलपरकडे देण्यात येईल अशी विस्तृत माहिती देण्यात आली.