अग्निशमन केंद्राचाही फोन बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:03 PM2019-01-31T23:03:19+5:302019-01-31T23:03:39+5:30
महावितरणचा दणका; डिझेल भरण्यास पैसे नसल्याने जनरेटर सेटही ठप्प
बोईसर : वीज बिल थकविल्यामुळे बी एस एन एल च्या तारापूर दूरध्वनी केंद्राचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केल्याने पालघर जिल्ह्यातील बीएसएनएलचे हजारो दूरध्वनी व भ्रमणध्वनी आणि इंटरनेट सेवा बुधवार संध्याकाळ पासून ठप्प झाली आहे विशेष गंभीर बाब म्हणजे तारापूर अग्निशमन दलाचे दूरध्वनी बंद झाल्याने आगीची घटना घडल्यास अग्निशमन दलाशी संपर्क साधता येणार नसल्याने सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे.
बीएसएनएलच्या तारापूर दुरध्वनी केंद्राचे ज्युनियर टेलिकॉम आॅफिसर यांच्या नावी असलेल्या ०७३०१०००७०४३ या कंझुमर नंबर चे मागील वीज बिल ६ लाख ९५ हजार ७०० रुपये असून दिनांक ३ नोव्हेंबर, २०१८ रोजी ते भरले होते. परंतु, आता चालू बील रुपये २ लाख ८३ हजार आणि मागील थकबाकी ६ लाख ४४ हजार असे एकूण ९ लाख ३२ हजार ३१० भरणे बाकी आहे त्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. मोबाईल टॉवर ऑप्टिकल फायबर केबल ( ओएफसी ) द्वारे सर्व दूरध्वनी केंद्र जोडले गेली आहेत. खंडित केलेल्या वीज पुरवठ्यामुळे पालघर, डहाणू व तलासरी या तीन तालुक्यामधील गावागावांमध्ये असलेले सुमारे ४० दूरध्वनी केंद्र ठप्प झाली आहेत.
अत्यावश्यक म्हणून दिले भ्रमणध्वनी
अत्यावश्यक म्हणून अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:चे मोबाईल नंबर दिले आहेत. अनंत परब अग्निशमन अधिकारी ८१०८०७७७८७, सहाय्यक अग्निशमन अधिकारी दिनेश अंबुरे, ९९२२९४६१०१, उपअग्निशमन अधिकारी हरेश्वर पाटील ७०२०१९७६०८ आदी.
तारापूर दुरध्वनी केंद्र येथून पालघर, डहाणू , तलासरीची दूरध्वनी सेवा कार्यान्वित होते. वीज नसल्याने सर्वसवर परिणाम झाला आहे. बील लवकरत भरण्यासाठी वरिष्ट पातळीवरु न प्रयत्न करीत आहोत अशी माहिती सब डिविजनल इंजिनिअर ओ. पी. सिंंग यांनी दिली.
बीएसएनएलच्या तारापूर दूरध्वनी केंद्राने तीन मिहन्यापासून वीज बिल भरणा न केल्याने वीज पुरवठा खंडित केला आहे . या वीज बिल भरणा संदर्भात वारंवार सूचना देण्यात येत होत्या शेवटी नाईलाजास्तव वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
लक्ष्मण राठोड,
उपकार्यकारी अभियंता
महावितरण एमआयडीसी तारापूर.