जागतिक छायाचित्र दिनानिमित्त फोटो प्रदर्शन
By पंकज पाटील | Published: August 23, 2023 07:33 PM2023-08-23T19:33:47+5:302023-08-23T19:34:03+5:30
एक सप्ताह सुरू राहणाऱ्या या छायाचित्र प्रदर्शनास बदलापूरकर मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.
बदलापूर: जागतिक छायाचित्रदिन सर्वत साजरा होत असतांना देशात वेगवेगळ्या ठिकाणी छायाचित्रांच प्रदर्शन भरवण्यात येत.आहेत. अशाच प्रकारच वन्य जीव छायाचित्र प्रदर्शन रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी आणि पॉस बदलापूर यांच्या माध्यमातून हेंद्रेपाडा परिसरातील आर्ट गॅलरीत भरवण्यात आले आहे.
निसर्गातील सूक्ष्मजीव ,प्राणी, पक्षी तसेच दुर्मिळ वनस्पती यांची छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आलीत. यामध्ये राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार प्राप्त झालेल्या काही छायाचित्रांचा देखील समावेश आहे. निर्सगातील वन्य जीवांची छायाचित्र प्रेक्षकांना भारावून टाकत आहेत. त्यामुळेच एक सप्ताह सुरू राहणाऱ्या या छायाचित्र प्रदर्शनास बदलापूरकर मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.
बदलापूर मधील नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना वन्यजीवांची ओळख व्हावी आणि निसर्गाच्या संवर्धनाची जागरूकता शालेय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन लावण्यात आल्याचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले. वन्य जीवांचे छायाचित्र पहायचे असतील तर हेंद्र पाडा परिसरातील आर्ट गॅलरीमध्ये सुरू असलेल्या या छायाचित्र प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.