Ambernath: अंबरनाथच्या शिवसेना शाखेतून उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो काढले

By पंकज पाटील | Published: March 14, 2023 06:15 PM2023-03-14T18:15:54+5:302023-03-14T18:16:57+5:30

Ambernath: अंबरनाथमधील शिवसेनेचे ठाकरे गट शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू असतानाच अचानक आज शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले आहेत.

Photographs of Uddhav and Aditya Thackeray were taken from Shiv Sena branch in Ambernath | Ambernath: अंबरनाथच्या शिवसेना शाखेतून उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो काढले

Ambernath: अंबरनाथच्या शिवसेना शाखेतून उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो काढले

googlenewsNext

- पंकज पाटील 
अंबरनाथ: अंबरनाथमधील शिवसेनेचे ठाकरे गट शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू असतानाच अचानक आज शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेतून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो तसाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शाखेसह ठाकरे गटातील सर्व पदाधिकारी शिंदे गटात जाणारे निश्चित मानले जात आहे.

अंबरनाथ मधील शिवसेनेच्या ठाकरे गटातील सर्व पदाधिकाऱ्यांना शाखेसह शिंदे गटात घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत ठाकरे गडाच्या शहरप्रमुखांसोबत देखील स्वतः खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी चर्चा केली आहे. शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटातील सर्व पदाधिकारी शिंदे गटात येणार हे निश्चित मानले जात असतानाच आता शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत ठाकरे यांचे सर्व फोटो काढण्यात आले आहेत. शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेमध्ये यापूर्वी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो लावण्यात आले होते.

शिवसेना दोन गटात विभागल्यानंतरही या शाखेतील ठाकरेंचे आणि एकनाथ शिंदेचे फोटो तसेच ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या दोन दिवसात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना शिंदे गटात घेण्यासाठी सर्व ताकद पणाला लावण्यात आली असून आता संपूर्ण शिवसेना ही शिंदे गटात येणार हे निश्चित मानले जात आहे. त्यातच सोमवारी शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेत असलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो काढण्यात आले आहे. तर एकनाथ शिंदे यांचा फोटो तसाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचे मध्यवर्ती शाखा ही शिंदे गटाच्या ताब्यात जाणारा आणि त्यासोबतच ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील शिवसेनेत जाणार हे निश्चित झाले आहे.

Web Title: Photographs of Uddhav and Aditya Thackeray were taken from Shiv Sena branch in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.