मल्टिप्लेक्सच्या समोशात आढळला कापडाचा तुकडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 12:10 AM2019-05-11T00:10:55+5:302019-05-11T00:11:41+5:30

पश्चिमेकडील भागात असलेल्या मॉलमधील ‘एसएम ५’ या मल्टिप्लेक्स सिनेमागृहातील समोशात कापडाचा तुकडा आढळल्याने येथील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

A piece of cloth found in a cloth of multiplex | मल्टिप्लेक्सच्या समोशात आढळला कापडाचा तुकडा 

मल्टिप्लेक्सच्या समोशात आढळला कापडाचा तुकडा 

Next

कल्याण - पश्चिमेकडील भागात असलेल्या मॉलमधील ‘एसएम ५’ या मल्टिप्लेक्स सिनेमागृहातील समोशात कापडाचा तुकडा आढळल्याने येथील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकारानंतर मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मल्टिप्लेक्स गाठत समोसा बनवणा-याला ‘खळ्ळ खट्याक’चा दणका दिला. दरम्यान, याठिकाणी खाद्यपदार्थांची चढ्या दरानेच विक्री होत सुरू असल्याचे उघड झाले आहे.

मल्टिप्लेक्समध्ये प्रतिमा खरात शुक्रवारी सकाळी मैत्रिणीसोबत चित्रपट पाहण्यासाठी आल्या होत्या. चित्रपटाच्या मध्यंतरात त्यांनी मल्टिप्लेक्समधील स्टॉलवरून तब्बल ९० रु पये देऊन दोन समोसे विकत घेतले. त्यातील एक समोसा त्यांनी खाल्ला, तर दुसरा समोसा खात असतानाच त्यांना त्यामध्ये कापडाचा मोठा तुकडा आढळल्याने त्यांना धक्काच बसला. ते पाहून त्यांला उलटीही झाली. याप्रकरणी त्यांनी मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाला जाब विचारला आणि आपल्या नातेवाइकांना फोन करून बोलावले. हा प्रकार मनसे महिला शहर अध्यक्ष शीतल विखणकर यांना समजताच त्यांनीही अन्य कार्यकर्त्यांसह मल्टिप्लेक्स गाठत व्यवस्थापनाला धारेवर धरले.

समोसा बनविणाºयाच्या कानशिलातही लगावून कापड मिळालेला समोसा त्याच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थापनाने खरात यांची माफी मागत पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांसमोर सांगितले. याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती विखणकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

चढ्या दराने विक्री सुरूच
बाहेर मिळणा-या १० रुपयांच्या समोशासाठी ४५ रुपये आकारले जातात हेहीया घटनेतून समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी मनसेने मॉलमध्ये खाद्यपदार्थांची चढ्या दराने होत असलेल्या विक्रीविरोधात आंदोलन केले होते. पण चढ्या दराने आजही विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान मल्टिप्लेक्समधील महागडे खाद्यपदार्थ आणि त्यांच्या दर्जाबाबत या घटनेने पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Web Title: A piece of cloth found in a cloth of multiplex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.