विनावापर रेल्वे रुळाचा तुकडा पडलेला दिसू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:38 AM2021-05-16T04:38:51+5:302021-05-16T04:38:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, कल्याण ते कर्जत, दक्षिण पूर्व घाट, कर्जत ते ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण, कल्याण ते कर्जत, दक्षिण पूर्व घाट, कर्जत ते पनवेल सेक्शनमध्ये चालू असलेल्या विविध कामांसह मान्सूनपूर्व तयारी आणि प्रवासी सुविधांशी संबंधित कामांचा आढावा रेल्वे अधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी यंत्रणेतील सुधारणेच्या मूळ कारणांचे विश्लेषण करण्याचा आदेश, तसेच विविध सेक्शनमध्ये विनावापर रेल्वे रुळाचा तुकडा पडलेला दिसू नये म्हणून मोहीम सुरू करण्याचे निर्देश मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी दिले.
शनिवारी त्यांनी मुंबई विभागातील उपनगरीय आणि घाट सेक्शनचे सेफ्टी निरीक्षण केले. यावेळी डीआरएम शलभ गोयल व अधिकारी उपस्थित होते. मान्सूनपूर्व कार्याचा वेग वाढविण्यास सांगत त्यांनी सर्व मान्सूनपूर्वीची कामे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यांनी फील्डमधील कर्मचाऱ्यांना नियमित आणि मान्सूनपूर्व कर्तव्यांबाबत जागरूक राहण्याच्या सूचना दिल्या. विभागीय अधिकाऱ्यांना नियमित पाणी पुरवठ्याची गुणवत्ता तपासण्यासाठी, एफओबी, आरओबीचे सेफ्टी ऑडिट करण्यास सांगितले. फिल्डवरील व कार्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची चौकशी केली. कर्मचाऱ्यांना लस मिळावी, यासाठी प्रत्येक शक्यता तपासून घेण्यास सांगितले. स्थानकांची स्वच्छता, ड्रोनद्वारे तपासणी यांच्यासह ट्रान्समिशन लाइनची देखभाल पथके, ट्रेन चालण्याची गुणवत्ता यावर भर दिला.
--- ------- ----
वाचली